पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देशाच्या बाजूनें, बाळाजीनें नगरच्या बाजूने व जानोजी भोसल्याने अलज पूर-बाळापुरच्या (क) बाजूनें सलावताला कोंडून टाकिलें. तेव्हां तो तहाच्या गोष्टी बोलू लागला. रघुनाथरावदादांचाहि हात (ड) ह्या मोहिमेंत होता. मानाजी आंग्रयानेंहि तुळाजीवर (९) स्वारी केली. १७५३ च्या जानेवारीत रघुनाथरावदादा भालकीहून निघाले ते थेट गुजराथेंत (१०) अमदाबादेवर गेले; होळकर माळव्यांत गेले; शिंदे देशों मेपर्यंत राहिले; जानोजी गाविलगडावर (११) गेला; व बाळाजी बाजीराव (१२) श्रीरंगपट्टणावर तसेच चालून गेले (पत्रे व यादी १४). १७५३ च्या जून-जुलैंत दादा थालनेरास आले; नाना श्रीरंगपट्टणाहून पुण्यास आले; होळकर इंदुरास जाऊन बसले; व शिंदे श्रीगोंद्याहून निघून रघुनाथराव दादास मिळण्यास थालनेरास सप्टंबरांत गेले. दादांनी १७५३ च्या सप्टंबरापासून डिसेंबरपर्यंत (१३) माळव्यांतील मवाशीलोक व संस्थानिक ताळ्यावर आणिले. १७५४ च्या जानेवारीत बाळाजी बाजीराव (१४) होतीहोनूरच्या स्वारीस गेले; रघुनाथराव दादांनी (१५) कुंभेरीस वेढा दिला; व जानोजी (१६) निजामअल्लीवर चालून गेला. १७५४ च्या ३ जुलैस वाळाजी पुण्यास आले; व कुंभेरीहून दादा दिल्लीस गेले; जयाप्पाने ( १७.) मेडत्याकडे स्वारी केली व विठ्ठल शिवदेवाने सप्टंबरांत (१८) ग्वालेरीस वेढा घातला. १७५५ च्या जानेवारीत बाळाजी बाजीराव (१९) विदनूरच्या स्वारीस निघाले, कृष्णेपर्यंत गेले व तेथे महादाजी अंबाजी पुरंधऱ्यावर स्वारी सोपवून सिंहस्थाकरितां टोक्यावरून नाशकास परतले ( पत्रे व यादी १६ ). १७५५ त दादा दिल्ली, रोहिलखंड, कुमाऊ, काशी, प्रयाग, जयनगर, रजपुताना इत्यादि ठिकाणी (२०) स्वारी करून आगस्टांत पुण्यास आले. जयाप्पाने नागोरास (२१) वेढा दिला. जानोजीने निजामावर ( २२ ) स्वारी केली. दत्ताजीने नागोरचा वेढा संपवून ( २३ ) बुंदीकोट्याच्या राणीस १७५६ त मदत केली. १७५६ च्या जानेवारीत बाळाजी बाजीरावानें, सदाशिव चिमणाजी, जानोजी भोसले, मुधोजी भोसले, विठ्ठल शिवदेव, महादोबा पुरंधरे, मल्हारराव होळकर इत्यादि मंडळीसह सावनुराला (२४) वेढा दिला. रघुनाथरावदादा हिंदुस्थानांतून १७५५ च्या आगस्टांत पुण्यास येऊन, तेथून गलगल्यास आपलें लग्न करून, बाळाजीस सावनुरास मिळाले व तेथून निघून त्यांनी कित्तूरावर (२५) स्वारी केली. मानाजीने संभाजीवर विजयदुर्गास (२६) स्वारी केली. १७५६ च्या सप्टंबर-आक्टोबरांत रघुनाथरा" दादानी सदाशिव रामचंद्राला घेऊन गुजराथेवर स्वारी केली. - १७५७ च्या जानेवारीत बाळाजी बाजीरावाने श्रीरंगपट्टणावर ( २७) स्वारी केली. गोपाळराव पटवर्धनाने सोंधेविदनूर प्रांतातून श्रीरंगपट्टणाला (२८) जबरदस्त शह दिला व बळवंतराव मेहेंदळ्याने गुत्तीकडून चिक्करुष्णराजाला चेपिलें. १७५६ च्या नोव्हेंबर