पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/238

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११३ दर महादेव झांशीस होते. काही भ्रम झाला होता. त्यांचा काल जाहला. बापूजी महादेव झांशीस आहेत. मनसूरअल्लीरखानाचा लेक गंगापारच आहे. ऐसें वर्तमान सराफियांत आले. त्याजवरून लिहिले असे. जर श्रीमंत राजश्री नानासाहेब जातील आणि त्याचे पारपत्य उत्तम होय तर उत्तमच आहे, नाहीतर पठाण दरमजल माळव्यांत आला तर बहुत खराबी आहे. पुढे में श्रीस कर्तव्य असेल ते होईल. नवाब सलाबतजंग कलबर्गीयावर आहेत. व्यास शहरी येणार आहेत. छ २७ तारखेस येथे दाखल होणार आहेत. याप्रमाणे पुण्यास लिहिले आहे तें वर्तमान सेवेसीं लिहिले आहे. दुसरें पत्र कृष्णाजी भैरव थत्ते यांचे छ १२ रजबीं आले. त्यांत मजकूर की पठाणाने गाजुद्दीखान यास हरोली दिल्ही व पन्नास हजार फौज नवी दिल्लीमध्ये चाकर ठेविली तोफखाना तमाम सांगातें घेतला. शाहाजादा सांगातें घेतला. मथुरेत कत्तल केली. अलमशाहाची द्वाही फिरविली. येथून आयचास आला. एक मुक्काम केला. रयत लोक जाऊन भेटले. पांच लक्ष रुपये खंडणी घ्यावीशी केली, कोणास उपद्रव दिल्हा नाही. समशेरबहादर आग्रयास होते तेथन निघाले. श्रीमंत राजश्री दादासाहेब व मल्हारजी होळकर उदेपुराकडे जावहाकडे गेले. लाख रुपये तेथील खंडणी केली. पठाण झांशीस येणार, तेथून पुढे कोठे येईल हे नकळे. याप्रमाणे वर्तमान लिहिले आलें तें सेवेसी लिहिले आहे. विदित जाले पाहिजे. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना. १३७ कृष्णजोशी व थत्ते ह्या दोघांच्याहि पत्रांतील मजकूर बराच एकसारखा आहे. तेव्हां तो अगदी विश्वसनीय आहे व त्याचमानाने भाऊसाहेबांच्या बखरीतील ३०, ३१, ३२, ३३ पानांतील मजकूर काल्पनिक आहे. .