पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/237

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आगन्यास आला, ते या फौजांनी कुच करून झांशीच्या रोखें आल्या. समागमें रयत आली होती ते याच उभयतांनी लुटन घेतली. मोठा विश्वासघात केला ! पंचवीस लक्षांचे वित्त घेतले. हल्ली झांशी जवळ येऊन पडले आहेत. उभयता मिळोन फौज दहा बारा हजार आहे. व पठाणाजवळ फौज पन्नास हजार चांगली आहे. गाजद्दीखान व खानखानांची फौज वेगळी आहे व आराबाहि आहे. खजाना पन्नास लक्ष रुपये समागमें आहेत. पठाणाचा नायब दिल्लीत बसला आहे. तो फौज वरचेवर ठेवीत आहे. तहि फौज याजला सामील होणार ऐसे दिसते. पठाण बंगाल्यास जाणार व दक्षणेसहि येणार. मूळ झांशीस लवकर येतो ऐशी बोली आहे. जाट आपल्या गढीत बसले आहेत. परंतु भयाभीत बहुत आहेत. श्रीमंत राजश्री दादासाहेब व मल्हारजी होळकर वगैरे सरदार कुल ज्यावहेजवळ होते. त्याप्त ज्यावहेपासून लाख रुपये खंडणी घेतली. उपरांतिक उदेपुरच्या नाजाचा भाऊ होता तो येऊन भेटला. ह्मणं लागला की माझा विभाग राजा देत नाही, त्यावरून ज्यावह परगणा व राणीखडा ऐसे दोन्ही महाल श्रीमंतांनी लुटन पस्त केले. दहा बारांचे वित्त तेथून निघाले, आणि तेथेच मुक्काम करून राहिले आहेत. समागमें फौज चाळीस हजार आहे. वरचेवर जमा होत आहे. पठाण बहुत भारी आहे. जर पठाण झांशीस आला तर कठीण आहे. पठाणावर प्रस्तुत कोणी जावें असें दिसत नाही. राजश्री अंताजी माणकेश्वर यांणी लढाई चांगली घेतली. परंतु पठाणाची फौज भारी यामुळे उपाय नाही. परंतु आपलीशी करून पळून आले. अंताजी माणकेश्वर याचा पुत्र पडला. परंतु पठाणास हात चांगला दाखविला. हल्ली श्रीमंतांपाशी आहेत. राजश्री बापूजीपंत वकील दिल्लीहून पळून मथुरेस आले. तेथून निघोन राजश्री नारो शंकर यांच्या लष्करांत आले. त्यांचे बंधु दामो पिरंत पठाण बंगाल्यास हि गेला नाही व दक्षिणेसहि आला नाही.गेला व आला असतां तर, इतिहास निराळ्या त-हेने लिहावा लागला असता. ह्यासंबंधी लेखांक ६५ तलि शहानवाजखानाचें अबदालीसंबंधी मत पहा.