पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/234

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ल्यापूर्वी पुढे लुगारे धाडून पेठ लुट्न घेतली. आली येतांच धास्तीनें कौलास येऊन ठाणे दिल्हें. ठाणे फार चांगले आहे. परंतु माणूस पोंकें ! फौज गावांजवळ येतांच अवसाने जाऊन ठाणी देतात ! स्वामीचे पुण्य विचित्र आहे ! खासा पट्टणचा हिसाब धरीत नाही. परंतु, एकाएकी जाऊन थडकाबें तें उत्तम नाही. याजकरितां मात्र हलकें दम धरीत, ठाणी घेत, पुढे जात जात, सलाबत वाढवून जावें ह्मणोन चंदराजपट्टणास आलो. येतांच ठाणे वेतले. बंदोबस्तीस्तव आज येथे मुक्काम केला. उदेक कुच करून पुढे जातो. पट्टणचे वकील येतात न येतात हेहि कळेल. डोळे उघडोन ताळ्यावर आले असले तर उत्तम ! जुजावयाचाच दम असला तर चिंता काय आहे ? खामाखा तेथेच जाऊन फौजेचे स्वरूप दाखवं. स्वामींनी लि॥ कीं हैदरनाईक वगैरे जमाव जमा होऊन नदीअलीकडे राहिले असले तर खामाखा मोडून आत घालाव. त्यांत साध्यासाध्य पाहून करावें. अलीकड नसले तर जाऊन थडकावयाचे प्रयोजन नाही. यंदा मोर्चे लावावयाचीहि केवळ मसलत नाही. हे गोष्ट गुप्तच राखोन छावणीचा बेत सर्वत्र प्रगट करावा. गढ्या घेऊन जपून असावें झणजे सहजच......त्र यास या तों गढ्या... ...स राहाल झणजे सहजच टाकतील. ह्मणोन आज्ञा केली. ऐशास हैदरअल्लीखान अद्याप आला नाही व आणखीहि कोणी कोठून आला नाही. पट्टणांतहि थोडीशी फौज व गाडदी वगैरे जे आहे तेवढे मात्र आहे. ते कोणी शहराबाहेर निघावयाचे नाहीत. हैदरअल्लीखान वगैरे येणार ते आल्यावर पुढे बाहेर राहावयाचा विचार करणे तर करितील. बते-या बांधितात. तेथें चौक्या ठेवणे तर ठेवितील. ते शहर आस-यानेच राहतील. नदीअलीकडे राहावयाची जुरंत काय ? आणि त्याच्या येण्याच्याहि बातमीत आहों. वरचेवर वर्तमान कळल तसे करूं. छावणीचाच म॥र प्रगट करावा ह्मणोन आज्ञा केली. ऐशास छावणी विषयी पहिली पत्रं आली तेव्हां पासोनच पट्ट १३२ गोपाळरावाच्या १७५७ तल्या मार्चातील ह्या मोहिमेसंबंधी ग्रांटडच्या ग्रंथांत एक अक्षर नाही. खामखा असेंहि ह्या शब्दाचे रूप आहे