पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/235

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११० णचे मसलतीस दबाव समजोन छावणी प्रगट केलीच आहे. स्वामीच्या पुण्यप्रभावेकरून लौकरच ताळ्यावर येऊन वकील पाठवितील. ठाणीठुणीं एक पट्टणावांचून कोणी टिकत नाही. ठाणी घेतली. मुलुक खराब झाला. पुढे फारच होईल हे समजोन व पट्टणास येणार हे सलाबत जबरदस्त आहे ह्याने मीत होऊन संस्थानचे अपेश नंदराज घेणार नाही.३३... [६३] ॥ श्री ॥ ३ एप्रील १७५७. सेवेसी विज्ञापना. त॥छ १३ रजब पावेतों वर्तमान यथास्थित असे. विशेष. कृष्ण जोशी यांचे पत्र शहरीहून पुण्यास छ १२ रजबी आले. त्यांत दिल्लीकडील मजकूर. पठाण दिल्लीत येऊन अमिरांच्या घरावर चौक्या बसवून द्रव्य कुल घेऊन रयतीस उपद्रव फार दिल्हा. आणि तिसा करोडीचें वित्त जमा करून पुत्रासमागमें दहा हजार फौज देऊन लाहोराव. रून आपल्या देशास रवाना केले. आणि पठाण दिल्लीच्या बाहेर निघाला. समागमें गाजुद्दीखान व कमरद्दीखान याचा लेक" व बंगाल्याचे राजाचा वकील ऐसे तेथून कुच करून बलभगडाजवळ आले. तेथून जे कुच केलें ते मथुरेजवळ गेले. आंत पांच हजार जाट होते ते बाहेर आले ; आणि यासीं युद्ध उत्तम प्रकारे घेतले. परंतु, पठाण भारी. त्यास कटून मेले. आणि दोन हजार जाट पळून गेले. आणि पठाणाच्या लोकांनी मथुरेवर हल्ला केला. त्यास दीड प्रहर लूट व कतलाम झाली. मग द्वाही अलमशाहाची फिरविली. पंचवीस लक्ष वित्त घेऊन आपला अंमल बसवून मथु ॥ ताळे मस्तक, दैव, ताळ्यावर डोक्यावर शुद्धीवर. १३३ ह्यापुढील तीन ओळी फाटून गेल्या आहेत. १३४ मीरमन.