पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/232

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६१] ॥ श्री॥ १४ मार्च १७५७. - राजश्री बाळाजी गोविंद, कमाविसदार, महालानिहाय, प्रांत अंतरवेदी, गोसावी यांसीः . अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य स्ने॥ जनकोजी शिंदे दंडवत सु॥ सबा खमसैन मय्या व अल्लफ. राजश्री शिवराम देवाजी वकील दिमत नवाब अहमदखान पठाण यास पूर्वी अंतरवेद येथील ऐवजी सन इसनेत समाईक ऐवजी रुपये ३०० तीनशेची असामी दिल्ही होती. त्यास हल्ली वाटणी जैहाली. श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीकडे रुपये (१००) शंभर व राजश्री मल्हारजी होळकर याजकडून रुपये (१००) शंभर, एकूण दोनशे. बाकी आमांकडील रुपये (१००) शंभर रुपय करार करून दिल्हे असेत. तर मशारनिल्हेस आमच्या महालच्या ऐवजी शंभर रुपये पावते करून कबज घेणे, जाणिजे. छ २३ जमादिलाखर. बहुत काय लिहिणे. हे विनंति. पे॥ छ १० साबान. श्रीगणराज. २२ मार्च १७५७. श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेसी:विनंति सेवक गोपाळराव गोविंद व मल्हारराव भिकाजी कृतानेक साष्टांग १३१ ह्यावरून ह्या प्रांतांत पेशवे, होळकर व शिंदे ह्यांच्या सारख्या सारख्या वांटण्या झाल्या असे दिसते. ४५, २२॥, २२॥, १० व ५३०, २३, २३, व ३१,३०, ३०, ९ अशा वाटण्या पेशवे, होळकर, शिंदे व पवार ह्यांच्या माळव्यांत, राजपुतान्यांत व हिंदुस्थानांत झालेल्या होत्या असें निरनिराळ्या ठिकाणी लिहिलेले आढळते. ह्या चारी वांटण्या खरोखरच झाल्या असून निरनिराळ्या काळी निरनिराळ्या प्रांतांकरितां झाल्या असे समजल्यावांचून गत्यंतर नाही. माळव्याच्या १५० लाख उत्पान्नपैकी ७४॥ होळकराला,