पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/231

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

करून नवद हजार रुपये तुह्मां कडून देविले. त्यास, वरात तुझांकडे पाठविली. त्यास, रा. गोविंद बल्लाळ देशास गले. तुह्मीं जाबसाल केलात की ऐवज आह्मांकडे नाहीं; याप्रमाणे जाबसाल केले. दोनचारदां तुह्मांकडे पत्रे पाठविली. परंतु, ऐवज द्यावयास तुझांस अनुकूल न पडे. आही सरकारचे चौकर नाहीं, गोविंदपंताचे चाकर, याप्रमाणे नानाप्रकारच्या गोष्टी सांगितल्या. निदान पंचवीस हजार रुपये दिले. चाकी ऐवज नाही ह्मणोन जाबसाल केला, ह्मणोन वर्तमान कळलें. ऐशीयास, तीर्थरूपांनी नवद हजार रुपयांची वरात तुह्मांवर केली. श्रीमध्ये खर्चास ऐवज देविला असतां तुही ऐवज न दिला ही गोष्ट उत्तम न केली. सरकारचा ऐवज तुह्मांकडे असतां अशा गोष्टी सांगाव्या हे तुमच्या स्वरूपास उत्तम नव्हे. कदाचित् ऐवज नसला आणि सरकारची वरात झाली तरी तुझी मातबर मामलेदार. हर प्रयत्न करून ऐवज द्यावा. त्यास, हे वरात आणीक कोणाची नव्हे ऐसें जाणत असतां फार वाईट गोष्ट केली. बरें, जे केलेत तें उत्तम केलेत. हल्ली हे पत्र लिहिले असे. तरी पंचवीस हजार रुपये दिले ते वजा करून बाकी पासष्ट हजार रुपये राहिले ते झांशीस यात्रेहून आली आहेत त्यांजकडे पत्र पावतांच पावते करणे. यास अंतर केलेत तरी परिछिन्न खावंदाची अवकृपा तुह्मांवर होईल. ऐसे समजोन ऐवज प्रविष्ट करणे. जाणिजे. छ २२ जमादिलाखर. बहुत काय लिहिणे. १२९ चाकरांच्या चाकरांनी मुख्य धन्याला विचारूं नये ही नीति मराठी राज्यांत फार पूर्वीपासून शिरली होती. शिंदे आपल्याला पेशव्यांचे चाकर ह्मणवीत, आणि सातारच्या छत्रपतींना ओळखीत नसत. गोविंदपंताच्या मुलाची गोविंदपंताच्या धन्याशी हीच वर्तणक झाली ह्यांत फारसें नवल नाही. त्यावेळच्या नीतीला ती अनुरूपच होती.“राजद्वारी वस्त्रे घ्यावयास येणे ह्मणून बहुत आग्रह केला. विनंति केली की आह्मास गरज काय ? आमचे खावंद आपण. ह्मणोन गेलों नाहीं” ( पत्रे व यादी ५३, नानाफडणविसाचे आत्मचरित्र). हे विचार नानाफडणविसासारख्या पुरुषाचे! मग इतरांची गोष्ट काय पुसावी ! १३० काशीत.