पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/228

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०३ गोष्टीचा उजूर तिळतुल्य नाहीं. अगर राजश्री नानासच ठेऊन आह्मासी त्याजवळ राहावयाची आज्ञा जाली तथापि उजूर नाही. स्वामीचे जागां राजश्री नाना आहेत. हुजरास चाकरी करितों अगर स्वतंत्र असतां करितों त्यापेक्षां राजश्री नानांजवळ राहून त्यांची कृपा संपादून ते स्वमुखें स्वामीजवळ तारीफ करीत असे करून दाखवू. सेवेसी विदित होय हे विज्ञापना. [५८] ॥ श्रीशंकर ॥ १२ मार्च १७५७. सेवेसी विज्ञापना. जानराव आइतवळे याणी यंदा दोनचार लबाड्या केल्या. कोणत्या ह्मणाव्या तरी; एक तरी, सावनूरचे स्वारीस पागा घरी बसविली व चाकरी सुधी न केली. आणि रुपये तरी, पागा सरकारची, सबब देणे पडले. बारगिराचे तैनातेंत मात्र काटकुसूर केली. बाकी रुपया द्यावा लागला. या वेळेस आह्मांस राग होताच. आह्मीं स्वामीचे कानावर घालून त्यास झटले की तुला सरनोबत देतों; आणि त्याचे विद्यमाने चाकरी करावी. जर कबूल न करीस तरी पागा काढून दुसन्यास सांगतो. ऐसें ह्मटले. तेव्हां प्रयासें सरनोबताचे कबूल केले. परंतु हिशेब विल्हे लावून न घेत. तेव्हां शेवटीं बेलगंगेचे तळावर हिशेब हुसेनखान कायगांवकर सरनोबत ठहरावून, विल्हे लावून, पैका घेऊन, तयारीसाठी पाठविले. तेव्हां दुसरे दिवशी सरनोबतास टाकून उठोन गेले, तेव्हां आमीं मागाहून सरनोबत त्याजपाशी कागद देऊन पाठविले. त्यावर महिना पंधरादिवस वाट पाहिली. तेव्हां जासूद जोडी जानरायाचे नांवें मसला करून पाठविली. त्या जासूद जोडीस मसाला न दिल्हा व धक्के देऊन १२४ सोबतस्तु सेनानीः १२५ महसूल, पैसा.