पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/229

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाहेर घातले. याप्रमाणे जासुदांनी सांगतांच माझ्या हातापायाची आग जाहली. तेव्हां येथून राऊत पाठवून त्यास मारावें हें मनांत आले. परंतु, पुरती तहकीकात करून मारावें ऐसें मनांत आणून मारावें ऐसा विचार केला. ऐसियासी, जर जासुदास धक्के देवून बाहेर लाविलें तरी डोकें मारावे किंवा निदानी हात तरी तोडून टाकावा लागेल. स्वामींस कळावें ह्मणून लिहिले असे. याचे कसे करावें तें स्वामींनी लिहिले पाहिजे. परंतु, जासुदास धक्के मारिले, मसाला न दिल्हा व हुजूरहि न आले. तेव्हां पारपत्य केलेच पाहिजे. नाही तर आमची तरी अब्रू कशी राहील ? ॥ छ २१ नमादिलाखर. बहुत काय लिहिणे. हे विज्ञापना. प॥ छ १३ साबान [ ५९] श्रीशंकर १२ मार्च १७५७ सेवेसी विज्ञापना. स्वामींनी लिहिले की, " गोपाळ केशव वगैरे लक्ष्मण १. १२६ यूरोपियन लष्करी कायद्यापेक्षा पेशव्यांचा लष्करी कायदा फारसा सौम्य होता असें नाही. आइतवळ्याने केलेल्या अपराधाबद्दल देहांत शिक्षाच पाहिजे आहे. निदान हात तरी तोडण्याची शिक्षा मंजूर करावी ह्मणून दादा लिहितात. ह्यावरून लहान मोठ्या सरदारांना शिक्षा करण्यास मुख्य पेशव्यांची मंजुरी लागत असे हे उघड होते. तसेंच देहांत शिक्षेपेक्षा हात तोडण्याची शिक्षा सौम्य आहे असा त्यावेळचा समज होता असे दिसते. पाश्चात्यांच्या मताप्रमाणे देहांत शिक्षेपेक्षा हातपाय तोडणे किंवा डोळे काढणे किंवा नाक कापणे किंवा मिशी उतरणे किंवा गाढवावरून वरात काढणे इत्यादि शिक्षेचे प्रकार कडक निंद्य व निरर्थक, कारण ते मनुष्य प्राण्याच्या इभ्रतीला शोभण्यासारखे नसन केवळ पश तुल्य, आहेत. १२७ हे नारोशंकराचे बंधु. नारोशंकर, अंताजीमाणकेश्वर, गोविंद बल्लाळ इत्यादि मंडळी गैरशिस्त रीतीने पैसा खाऊन बहुत गबर झाली होती. शिवाय ही मंडळी पेशव्यांचे नुकसान करून पठाण, रोहिले, रजपूत, इत्यादींना आंतून फूस देण्याचाहि दुष्ट क्रम चालवीत असे. हे लोक किती उद्धट व बेपर्वा झाले होते हे पुढील पत्रावरून कळेल.