पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/227

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०२ किकासाठी प्रवास करणे मर्दासच योग्य आहे. गु॥ आग्रह करून बहुत बुद्धिवाद सांगोन राहविलें. यंदा कांहींसें फळास आले. आतां राहाच ह्मणून आग्रह करणार नाही. हौसेनें राहाल तरी फौजेचे साहित्य उत्तम प्रकारे करून देऊन जर नच बनेल तरी अति होष तुह्मावर नाही. यंदा सर्वहि उत्तमच तुझी केले. यंदा तुमचे राहणें न जालिया ईकडे जुनें राखावयास व काही तरी मेळवावयास सात आठ हजार फौज हरयेकसा बरें. चिरंजिव नाना राहिले तर ते अथवा बलवंतराव याजबरोबर ठेवावे लागतील. परंतु नवे नीट जथत नाही. एतद्विषयी तुमचे विचारें कसें तें लिहोन पाठवणे. तुमचे विचारे होईल तैसें कर्तव्य योजना करूं ह्मणून आज्ञा. ऐशास स्वामीची आज्ञा छावणीस राहावयाची आलिया सेवक लोकांस उजूर कोणे गोष्टीचा? मुख्यत्वेकरून लोक छावणीस राहिले आहेत. त्यांच्या घरास पैसा प्रविष्ट नाही. आणि दुसरी छावणी कबूल करितील न करितील हा भरंवसा वाटत नाही. तथापि मध्ये स्वामीची आज्ञाच जरूरीची जाली तरी लोकास सांगावयाचे रीतीने सांगोन राहतील ते राहतील. बाकी या प्रांतांत छावणी राहून पुढे कामास उपयोगी पडेसी फौजेची नेमणुक करून दिलिया छावणीस राहणे अगाध काय ? जे स्थली आपलेंच फौजनसीं राहावयाची आज्ञा होते ते समयीं लोक राहतील न राहतील हा भरवसा पुरत नाही. यास्तव न राहाण्याचा आग्रह करावा लागतो. हल्ली तों हुजरातची फौज द्यावयाची आज्ञा जाली. याशिवाय आमचे फौजे पे॥ राहतील ते. येणेप्रमाणे स्वामींनी कृपाळू होऊन बेजमी केलिया श्रीव्यंकटेशाजवळ छावणीची आज्ञा जाली. तरी राहूं. मुख्य गोष्टी ज्या सेवकाचे स्वरूप स्वामीचे कृपेकरून वाढले त्यापेक्षां प्रतिदिनी अधिकोत्तरी स्वामींनी वाढवावयाचें. धन्यानी चित्तांत आणिलें असतां सेवकानें न राहून पुढे काय मेळयावें ? सेवकानें धन्याची मर्जी संपादावी यांतच सेवकाचे स्वरूप व जे आपणांस योग्य त्यापेक्षां विशेषोत्कारें सेवा करून दाखवावी. मुख्य गोष्टी तोफखाना व फौज मातबर व चौमासी पोटाची बेनमी करून दिलिया कोणे