पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/226

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शीनेच करितों येविषयी अलाहिदा परवणी लिहिली आहे त्यावरून विदित होईल. तुर्त प्रयोजन नसतां लिहितों में बहुत गुप्त मनन करणे. तुमचे फौजेपैकी निमे लोक घरास जाऊन आले असतील ते लोक व कांहीं नवे ठेविले असतील ते व तुर्त राजश्री त्रिंबकराव तुकदेव तुमचें लगामींच आहेत. वरकड तोफखानियास छावणी करणे योग्य. आधी राजश्री यशवंतराव यांनीच राहावें, अथवा त्यांचे स्थळी राजश्री केशवरावहि योग्यच आहेत हुजरात पे॥ राजश्री विसोबा व हरबा व किरकोळ पागेचे पतके व हुजरात मिळोन पांच हजार तुमचे तेथील फौजे पे।। अजमासें निमे येकूण बारा तेरा हजार फौज जथून छावणी करून पट्टणकराजवळून पैका मातबर घ्यावा. तैसाच चिकबालापुर, सिरें, कडपें, वेंकटेश पावेतों स्वारी करावी. तुमची सलाबत बहुत पडली आहे. येक वर्ष मेहनत सांगितल्या प्रो केली पाहिजे. किती लौकिक वाढला व सरकार कामाचे ओझें उचललें यामुळे आमास बहुत आनंद वाटला. आणखी येक वर्ष खासा राहिल्यास बहुत काम होईल. हिंदुस्तानांत चिरंजीव दादानी दोन छावण्या केल्या. दत्तबांनी तीन केल्या. अंताजी माणकश्वर वगैरे दोन छावण्या करीतच आहेत. परंतु कर्नाटकांत मागें फत्तेसिंग व रघूजी भोसले यांची जाली. ग॥ पर्जन्य अतिवृष्टी जाली. तथापि श्रीकृपेनें निभाऊन सीरटी व कोपल येथील काम सर करतांच चहूंकडे चौका बसला. जे लोक बहुत काहिली करितील त्यास निरोप द्यावा. नवे व जे घरास जाऊन आले असतील व हुजरचे फौजे पे॥ पांच हजार ताबीजात करून घेऊन येक वर्ष मेहनत करून पर्ते काम फौजेचे उस्तवारी, करून सरकारचे कर्ज वारावयास पंचवीस उरवून देशास जावें. येक वर्ष तुह्मास अधिक राहणे पडते. त्यास खावंदाचे कामासाठी व आपल्या लौ १२२ पटवर्धन. १२३ छावण्या केल्या ह्मणजे पावसाळे काढले. दादासाहेब खमस व सीतच्या दोन्ही पावसाळ्यांत ह्मणजे १७५४।१७५५ च्या पावसाळ्यांत हिंदुस्थानांत होते. दत्ताजी शिंद्या अर्वा, खमस व सीत ही तीन सालें रजपुतान्यांत होता.