पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/225

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ELRA सेवेसी गोपाळ गोविंद व मल्हारराव भिकाजी कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना. स्वामीनी दस्तुरे पुरवणी लिहिली तेथे आज्ञा जे बिदनुरचे तुह्मी उरकिलें तेंच प्रमाण. परंतु पैक्याची निशा व हुंड्या व जातखत देणे तें चौकसीने निभावें सारिखें करणं ह्मणून आज्ञा. ऐशास जें करणें तें चौक १२० गोपाळराव गोविंद १७५४ च्या फेब्रुवारीत कोण्या संस्थानाकडे होता ते कळत नाही (ऐतिहासिकलेखसंग्रह नं. १). १७५५ च्या नोव्हेंबरांत सावनूरच्या स्वारीत गोपाळराव होता (ऐ. ले. सं. नं. २ ). सावनूरकरांशी तह झाल्यावर गोपाळरावाला पेशव्यांनी सोंद्यास पाठविलें. तो २१ मे १७५६ त फोंड्यास होता. तेथून शिरहट्टी घेऊन गोपाळरावाने बेदनुराची खंडणी केली तो १७५७ चा फेब्रुवारी आला. पुढे श्रीरंगपट्टणची स्वारी १७५७ च्या माचीत झाली. त्यावेळी गोपाळराव श्रीरंगपट्टणापाशी होता. १७५७ च्या मार्च एप्रिलांत गोपाळराव श्रीरंगपट्टणापाशी होता व त्याची मदत बळवंतराव मेहेंदळ्यास ह्या मोहिमेंत फार झाली ही गोष्ट ग्रांटइफ्ला माहीत नव्हती असे दिसतें. १७५७ च्या सप्टबरानंतर गोपाळ हरी झणजे गोपाळराव गोविंद बळवंतराव मेहेंदळ्याला मदत करण्यास येणार होता असें डफ लिहितो. परंतु १७५५ पासून १७५७ पर्यंत गोपाळराव कर्नाटकांतच होता हे आह्मीं कापलेल्या पत्रांवरून व ऐतिहासिकलेखसंग्रहांतील पत्रांवरून कळून येईल १७५८।५९ त गोपाळरावाला पेशव्यांनी हैदरावर ठेऊन दिले होते. त्यावेळी हैदराने गोपाळरावावर छापा घालून त्याला पराजित केले. पुढें जुजबी तह करून (ऐ. ले. सं. नं. २४ ) गोपाळराव १७६० त उदगीरच्या मोहिमेस येऊन मिळाला. उदगीरची लढाई झाल्यावर दौलताबादेचा किल्ला घेण्याचे काम पेशव्यांनी गोपाळरावावर सोंपिलें (ऐ. ले. सं. नं. १७।१८). १७६० त पानिपतास बहुतेक सर्व मराठे गेले असतां, हैदरावर दाब ठोविण्याकरितां गोपाळरावाला भ ऊसाहेबांनी देशी ठेवून दिले होते. येणेप्रमाणे १७५४ पासून १७६१ पर्यंत गोपाळरावाच्या हालचालीचा त्रोटक वृत्तांत आहे. १७५४ च्या अगोदर गोपाळराव काय करीत होता त्यासंबंधी पत्रे अद्याप कोठे छापिली गेली नाहीत. १७६१ पासून पुढची माहिती मात्र ऐतिहासिकलेखसंग्रहांत यथास्थित येत आहे. १७६१ पुर्वीचा पटवर्धन घराण्याचा इतिहास बहुतेक अज्ञात आहे. गोविंद हरी, रामचंद्र हरी व त्रिंबक हरी ह्यांनी कामगिऱ्या काय काय व कोठे कोठे केल्या त्याची तारीखवार माहिती पाहिजे आहे. १२१ मल्हारराव भिकाजी रास्ते हा गोपिकाबाईचा भाऊ. हा गृहस्थ गोपाळराव गोविंदाबरावर श्रीरंगपट्टणच्या स्वारीत होता. रास्त्यांच्याहि घराण्याचाइतिहास तारीखवार व सालवार अद्याप लिहावयाचाच आहे. ह्या घराण्याने दुसऱ्या बाजीरावाच्या वेळी रा उठाठेव केलेली आहे.