पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/224

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मान त॥ फाल्गुन वद्य द्वितीया |इंदुवार दरजागा हौदेगिरे जाणून स्वामीच्या कृपेनें यथास्थित असे. यानंतर बिदनूरच्या मामलतीचा निकाल जाहाला, त्याचा विस्तार राजश्री गोपाळराव याणी तपशीलवार सेवेसी विनंति लिहिली असे. त्यावरून श्रुत होईल. जातरोखा कार्तिक पूर्णिमेच्या वाईद्याने र॥ बसव लिंगाप्पा यांचा लिहून घेतला. हुंड्या भाद्रपद अखेरच्या बेदिकत लिहून घेतो. ।। नरसप्पा नाईक व रा॥ तुळाप्पा नाईक गुमास्ते वलबसुंदरदास यांचा कराररोखा लिहून घेतला, व साहा लाख रुपयाचा नकद द्यावयाचा करार. याचा तसलिमातरोखा उभयता सावकारांचा लिहून घेऊन ऐनजिनस पाठविला आहे. व नजरेचे हत्ती दोन व घोडे साहा यावेयाविसींहि . र॥ बसव लिंगाप्पास रुबरु राजश्री गोपाळराव याणी सांगीतले आहे. चांगले श्रीमंतांचे पसंदेस येत ऐंसेच संस्थानिक पाठवितील. आजीच्या हौदेगिरेच्या मुकामीहून ॥ नरसप्पा नाईक नख्त ऐवजाकरितां बिदनुरास जाणार आहेत. त्या समागमीं सेवकास रवाना केलेच तर नजरेचे हत्ती व घोडे व फर्माश लिहिली होती. आज्ञेप्रमाणे तलाश होऊन जो जिनस मिळेल तो सेवसी घेऊन येईन. बसव लिंगाप्पा येऊन भेटले तो तपशील राजश्री गोपाळराव यांच्या विनंतिपत्रीं साकल्य आहे. श्रुत होय. हे विज्ञापना. [५७] श्रीगणराज. ७ मार्च १७५७. पे जमादिलाखर सन सबा. संध्याकाळी सांडिणी स्वारा ब॥ आले. || ७ मार्च १७५७. हीच तारीख पुढील पत्राची आहे. कारण, ह्या व पुढील पत्राची पैवस्ती एकच आहे व पुढील पत्राचा ह्या पत्रांत उल्लेख आहे. ११९ लेखांक ५६ व ५७ ह्या दोन पत्रांची पैवस्ती एकच असल्यामुळे त्यांच्या रवानगीच्या तारखाहि एकच धरल्या आहेत.