पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/223

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[५५] ॥ श्री॥ २८ फेब्रुवारी १७५७. राजश्री बाळकृष्ण आपाजी कमाविसदार नि॥ श्रीमंत् राजश्री पंतप्रधान गोसावी यांसि अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्ने॥ जनकोजी शिंदे दंडवत. सु॥ सबा खमसैन मय्या व अल्लफ. प॥ यावल प्रांत खानदेश हा परगणा मोकासबाब खे॥" करून मोगलाई व स्वराज्य, गनीमाई, बाबती, सरदेशमुखी वगैरे कुली अंमल आझांकडे श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामींनी इनाम करून दिल्हा असे. तेथील अंमलास राजश्री महीपतराव नागेश यांसी पाठविलें असे. तर पाां म॥चं ठाणे म॥रनिलेच्या स्वाधीन करून देणे. जागा जागा तुमची माणसे असतील ती उठवून आणणे. हे आपली माणसें पाठवून अंमल करून घेतील. प॥१८ मजकुरीं वसूल तुह्मीं घेतला असेल त्याची रुजवात करून देणे. जाणिजे. छ ९ जमादिलाखर. बहुत काय लिहिणे. हे विनंति. [५६] पे॥छ१८ जमादिलाखर. ॥ श्री ।। ७ मार्च १७५७. श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेसी:आज्ञाधारक बाळाजी देवराव सा नमस्कार विनंति प्रार्थना. येथील वर्त११६ मुळांत 'त' चा पाय मोडला आहे व जागजागी जेथे सध्या बाळबोध लिहिण्यांत आपण अनुस्वार देतो तेथे बहुतेक ठिकाणी अनुस्वार दिलेले आहेत. यांसि' तील 'सि' हस्व काढिली आहे. ह्यांवरून, चुकली माकली का होईना, शुद्धलेखनाची थोडीबहुत अवश्यकता त्यावेळी भासू लागली होती असे दिसते. ११७ खेरीज. ११८ येथें जनकोजीचा शिक्का आहे.