पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/222

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

छावणीमध्ये चवकशी करणें तें करूं. तोपर्यंत याच मनसुबियांत गिरिफदार आहों. अंताजी माणकेश्वर व वकील व मनसाराम लिहीत असतील. यास्तव तिकडील सविस्तर वर्तमान लिहिले नाही. सांप्रत समशेरबहादर व नारोशंकर यांस अंताजीकडे जावयास एकदोन पत्रे पाठविली आहेत. आह्मीहि मागाहून जातो. फौज मातबर मिळाली नाही, यास्तव हलक्या हलक्या मजली करीत भारी होत जात आहों. रजवाडे वगैरे लहान थोर बलाविले आहेत. जाटहि जुझावयास तयार दिसतो. त्याचा मुलक जवळ पडला ह्मणोन त्यास जुंझणे प्राप्तच जाहालें. आमी गेलियावरी तोहि बहुधा येईल. स्वामींनों शिंदे व भोसले वगैरे पाठवावे. जानोजी भोसलेहि यावयाजोगे असले तरी पाठवावे. आतां तर आह्मींच जुंझत आहों. तथापि कदाचित लांबणीचा मनसुबा पडला, त्याची छावणी दिल्लीस जाहाली, आमची भोंवतीं जाहाली, तरी त्याचा उपयोग पडेल. तुर्त लडाई पडली तरी आमची आह्मी स्वामीचे प्रतापें करीतच आहों. मागाहून होईल ते लिहून पाठवू. र॥ छ ७ जमादिलाखर. बहुत काय लिहिणे. हे विनंति. म॥ श्रीरंगपटण. पै॥ छ १९ रजब, सन सबा. १७४२ त भाऊ १२।१३ वर्षांचे, दादा ११।१२ वर्षांचे व बाबा ९/१० वर्षांचे असावेत. तेव्हां १६४५,१६४९ इत्यादि शक टाकून १६५३ इत्यादि शक घेणे जरूर आहे. शिवाय दादा व बाबा ह्यांची लग्ने बाळाजी बाजीरावाने केली आहेत ( पत्रे व यादी ४९२,४७). ते बाजीरावाच्या मरणसमयीं अगदीच लहान ह्मणजे दादा ८९ वर्षांचे व बाबा ६।७ वषांचे असावेत. तेव्हां दादांची उमर ११।१२ असती तर त्यांचे लग्न त्यावेळच्या चालीप्रमाणे बाजीरावानेच केले असते. ह्या सर्व गोष्टींवरून भाऊसाहेबांचा जन्म शके १६५२ त घेणे प्रशस्त आहे. पत्रे व यादी ( ४९५ ) त बाजीराव ने इसवी सन १७३१ त रघुनाथरावाला वं जनार्दनबाबाला उमाबाई दाभाडीण इजकडे भेटावयास नेले व त्यावेळी ह्या दोघा मुलांची वयें दहा दहां, बारा बारा, होती ह्मणून लिहिले आहे ते सर्व कल्पनामय आहे हे वरील खुलाशावरून स्पष्ट आहे. ग्रांड डफ १७४१ सांत भाऊ दहा वर्षाचे होते ह्मणनं लिहितो ( भाग १७ पृष्टं २१७ मुंबई प्रतं ). ११४ गुंतलेलें. ११५ मथुरा इत्यादि ठिकाणे. १३.