पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/221

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आपले मुलुकांतील चौकशीचा मजकूर मनांत होता. परंतु हा मनसुबा मातबर पडला. हा शेवटास नेल्याखेरीज कोणास आमचे विचारें दुखवू नये. राजश्री नारो शंकर वगैरे हे महालकरी मातबर. बाज्या सरदार यांस या दिवसांत खर्च करता येत नाही. याजकडे किल्ले व मुलुक मातबर. यास्तव तुर्त यांजपासूनच चाकरी घेऊन पुढे अबदालीचें पारपत्य जाहालियावरी श्री ९ जुलै १७४२. चिरंजीव राजश्री रघुनाथ यासी प्रति बाळाजी बाजीराव प्रधान आशीर्वाद. उपरि येथील कुशल ताा छ १७ जमादिलावल जाणून स्वकीये कुशल लिहीत जाणे. विशेष. येथून जातेसमयीं जें सुचलें तें तुह्मास सांगितले आहे. त्याचे स्मरण निरंतर मनांत असूं देत जाणे. रघुवंश व विदूरनीत, चाणाख्य व जे तुह्मास येत असेल त्याची नेमपूर्वक चिंतणिका करून थोडेबहत शास्त्री यांजवळ नित्य ह्मणत जाणे. विराटपवापासून पुढे भारत रिकामपणी वाचीत जाणे. नेमेकरून शंभर दोनशें दंड निरंतर काढीत जाणे. केवळ घोडी फेरावयाचे छंदास न लागणे. वजनी, कैली, बेरीज, वरावद करावयाचा सराव बहुत करणे. चिरंजीव भाऊची मर्जी बहुत प्रकारे रक्षण करीत जाणे. जे आज्ञा करतील तेच काम करावें. बहुतकरून भाऊ बरोवरच जेवति जाणं. घोडी वेगळी बांधीत न जाणे. क्षद्र मनुष्यांशी सहवास कोणे प्रकारेहि न करणे. मातुःश्राबाई, ताई, अनुबाई यांसी एका दोहों दिवशी अर्ध घटकाभर जाऊन बसत जाणे. शरीरप्रकृत नीट नाही यास्तव औषध काही नेमेकरून घेत जाणे. भाऊ समागम घोडी फेरावयास जात जाणे. सातारियास जर जावयाची आज्ञा केली तर चिमणगिरी गंगाधरभटास भाऊजवळ विनंति करून बरोबर दिल्हे तर घेऊन जाणे. सातारियास गेलियावर दोहीं बाईकडे विना बोलाविल्यावांचून अथवा गोविंदराव यांणी आपणहून सांगितल्यावांचून न जाणे. कालानुरूप वयास उचित, योग्य वेष करीत असावें. देवपूजा थोडी, परंतु एकांती, न बोलतां, करीत जाणे. इतकेंहि नेमेकरून करावे आणि गर्व न करावा. निरंतर साधनवृत्तीने वडिलांची आज्ञा प्रसन्नतेने मानावी. सावध वर्तावें. सर्व जे मनेकरून समजेल ते समजावें. वडिलांची मजी उत्तम असलिया पुसावें. शिष्यधर्म असलिया फार उपयोग आहे. चिरंजीव जनार्दन बहुत कामहि करून पढतात. हे हरएक गोष्टींत अधिक जाहल्यास तुह्मीं मान्य पुरुष यांस असें व्हाल. विशेष काय लिहिणे. येथील वर्तमान तर उदेपुराजवळ पंचविसा दिवसांत पावलो. श्रीकृपेनें मेहनत करून दिल्लीचे सुमारे जात आहो. जसे पुढील वर्तमान येत जाईल, तैसी योजना होईल. हे आशीर्वाद.