पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/220

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वजीर नामर्दी करून भेटला. याजमुळे पातशाहत बुडाली व तोहि शेर झाला. सांप्रत त्याचे पारपत्य जाहाल्याशिवाय दुसरा मुलुकाचा अथवा पैक्याचा मनसुवा होणार नाही. यास्तव त्याचंच पारपत्य करणे जरूर पडेल. फौज आमची फार करून आली नाही व मल्हारबाची मुदलीच थोडी आहे. तेहि आली नाही, येथील बारीक वर्तमान ये रीतीचे! तथापि ईश्वरी दयेने व स्वामीचे प्रतापें सत्वरच पारपत्य करतो. स्वामींनी दत्ताजी शिंदे व मुधोजी भोसले यांची गोविंद बल्लाळ वगैरे लहानथोरांची रवानगी करावी. संग्रहकारांनी पेशव्यांची वंशावळ दिलेली आहे. तींत रघुनाथरावाचा जन्मकाळ शके १६४५ व भाऊसाहेबाचा जन्मकाळ १:५५ दिला आहे; परंतु ते दोन्ही शक सापेक्ष दृष्टीने चुकले आहेत. पत्रे व यादी वगरें ( ४९२) त भाऊसाहेबांचा जन्म शके १६५२ श्रावण शुद्ध ४ स दिला आहे. तो खरा मानिल्यास दादासाहेबांचा जन्म पुढे एक दोनवर्षांनी झाला असावा. पत्रे व यादी वगैरे (४९२) त दादासाहेबांचा व्रतबंध शके १६६१ माघ शुद्ध २ स झाला असे लिहिले आहे. व्रतबंध फार उशिरा झाला असल्यास आठव्या वर्षी झाला असला पाहिजे. त्यावरून दादासाहेवाचा जन्म १६५३ येतो. दादासाहेबाहून भाऊसाहेब वषसहा महिन्यांनी वडील धरल्यास शके १६५२ त भाऊसाहेब जन्मले हेच सयुक्तिक दिसते. वंशावळींत जनार्दनबाबाचा जन्मकाळ शके १६४९ दिला आहे तोहि चुकला आहे. कारण, लेखांक ६० ह्यांत जनार्दनवाबाची स्त्री सगुणाबाई हीस दादासाहेबांनी चिरंजीव ह्मणून ह्मटले आहे. जनार्दनबाबा वडील असते तर त्यांच्या स्त्रीस तीर्थरूप म्हणून दादासाहेबांनी म्हटले असते. जनार्दनबाबा दादासाहेबांहून दोन एक वर्षांनी लहान असावेत. तेव्हां, दादा, भाऊ व बाबा असा वयाच्या मानानें क्रम लागला. आतां भाऊसाहेबांचा जन्म शके १६५२ तच कशावरून? तर जनार्दनबावा शके १६६७ त बारा वर्षांचे होऊन वारले हे पत्रे व यादी ( ४९६ व ३६२) त लिहिले आहे. अर्थात् जनार्दनबाबाचा जन्म शके १६५५ त पडतो. रघुनाथराव वर्ष दोनवर्षांनी वडील धरल्यास त्यांचा जन्म शके १६५३ त येतो. व यादीत भाऊसाहेबाचा जन्मशक १६५२ म्हणून लिहिला आहे तो खरा ठरतो. तरी ह्या शकाची सत्यता खरी ठरण्यास आणखी एखादा पुरावा पाहिजे. पेशव्यांच्या बखरीच्या शेवटील वंशावळीत रघुनाथरावाचा जन्म शके १६४५ त दिला आहे. तो तर अगदीच असंभवनीय आहे. कारण, शक खरा मानिल्यास, सदाशिवरावभाऊ नानासाहेबांच्या अगदी बरोबरीचे होतात व रघुनाथराव व नानासाहेब यांच्यामध्येहि फारसें अंतर रहात नाही. नानासाहेब भाऊसाहेबाला व रघुनाथरावाला लहान पोरें समजत असत हे खालील पत्रावरून समजेल. हे पत्र मेणवली येथील दप्तरांतील आहे. हे नानासाहेब हिंदुस्थानांत स्वारीला गेले असतां लिहिलेले आहे.