पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/219

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९४ [५३] ॥श्री॥ १६ फेब्रुवारी १७५७, विनंति सेवक सखाराम भगवंत कृतानेक शिरसाष्टांग नमस्कार विज्ञापना. इकडील वर्तमान सविस्तर श्रीमंतांनी लिहिले आहे, विदित होईल. सारांश, अबदालीची फौज भारी. तमाम रजवाडे तिकडे जाणार. बिजेसिंग, माधो. सिंग यांचे वकील नेहमीच त्याजपाशी आहेत. मुख्य देक्षणेचा बंदोबस्त करावा हे सर्वांचे मानस आहे. आपली फौज व मल्हारबाची झाडून जमा व्हावयास फाल्गुन अखर लागेल. तुर्त जयनगरचे रोखे जात आहों. वाटेनें राणाजी कोठेवाला याजकडे बाकीचा सालजाब होईल तो करावा तों फौजाहि येतील. भारी होऊन जावें तों तो कोणे रोखें होतो हे पाहून सडे होऊन गांठ घालावी हा विचार आहे. गोष्ट तुर्त सर्व प्रकारें भारीच आहे. आपली फौज बेदिल, हे आपणांस विदितच आहे. तथापि स्वामींचे पुण्य थोर आहे. विना याचें पारपत्य जाल्याखेरीज सोडावेसें नाही. पुढे जसं वर्तमान होईल तसें विदित होईल. त्याप्रमाणे तर्तद करावी लागेल..... श्रुत होय. हे विज्ञापना. पै॥ छ १८ रनब, सन सबा. मु॥ श्रीरंगपट्टण. ce श्रीशंकर. २६ फेब्रुवारी १७५७. तीर्थरूपै राजश्री भाऊसाहेबाचे सेवेसी:विनति उपरि. सविस्तर मजकुराची पत्रे तीर्थरूपाचे नावें पाठवीत अ. सता त्याजवरून कळलच. सारांश, अबदाली दिल्लीस दाखल जाहाला. ११२ मराठे सर्वांना नकोसे झाले होते. ११३ ह्या पत्रांत दादासाहेबांनी भाऊसाहेबांना तीर्थरूप झटले आहे. तेव्हां ते भाऊसाहेबांहून लहान होते हे उघड आहे. पेशव्यांच्या बखरीच्या शेवटी काव्येतिहास