________________
विठ्ठलपंत आमची चार व मल्हारबा दोन, एकूण सहा हजार आहे. याखेरीज समशेरबहादर व अंताजीमाणकेश्वर व नारोशंकर पथके मिळोन पंधरा सतरा हजार फौज..................नव्या दमाची फौज ह्मणाघयास सा......................आहे. आमची व मल्हारबाची फौज .................. गुदस्ताची फौज चहूं . ............आह्माजवळ जमा जाहली नाही. अंताजी ............च आहे. झुंजतच आहे. फौज न आलिया .......... न जाता येत नाही. रुपये पावावयास लोकांस दिवस लागले. याजमुळे लोक मागे राहिले. व अगोदर पैका पावला तेहि खानदानचे लोक आले नाहीत. असो. आतां या गोष्टीचा काय विचार ? महिन्यादीडमहिन्यांत पोहोचतील. इतक्यांत गांठहि पडेल. जर दिल्लीस राहिला अथवा अलीकडे आला तरी गांठ पड़ेल. जर निघोन विलायतीकड चालला तरी दोन तीन महिने लढाई होणार नाही. सांप्रत खबर आली की पहिल्या पातशाहा अलमगीर सानीसे' पातशाही व खानखान्यास वजिरी दिली व आपल नांवचा शाहनशाहचा कुतबा पढविला. याजवरून पहावे की काय विचार करितो. तमाम राजे व सुज्यातदौला वगैरे सर्वांची राजकारणे त्याजपाशी आहेत. परंतु अद्यापि कोणी भेटले नाही. जाट तर झुंजू लागला. सांप्रत मनसुना भारी आहे. फौजहि त्याची भारी आहे व कजाख शिपाई आहे. त्याचे पारपत्यास फार भारी सामान असावें. यास्तव जर दत्तबाची रवानगी इकडे लवकर जाहाली तरी जमाव लवकर पडेल. अमदाबाजेचे ... ... ... हे काम मोठे व जरूर आहे. जरी अमदाबादकडे ... ... कडे प्रसंगानुरूप बलावू व येतीलहि..........ची रवानगी लवकर करावी. ...... पै॥छ १८ रज्जब, सन सबा. मु॥ श्रीरंगपट्टण. १११ समानी वंशांतील.