पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/217

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दास महापुरुष यांचे वंशीचे. हेहि श्रीगंगातीरी वास्तव्य करून भगवद्भक्तिपूर्वक सदाव्रत चालवितात. थोर आहेत. यांचे चालविल्यात श्रेयस्कर आहे. हे जाणून याजवर कृपाळू हाऊन मौजे शिराथ, देखील मजरे खाजगीपूर, हा गांव दरोबस्त बैरागी यांस सदाव्रताचे बेगमीनिमित्त करार करून दिल्हा असे. तरी, पेशजी गांव चालत आल्याचा दाखला मनास आणून चालत आल्याप्रमाणे यांस व यांचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरेनें मौजे मजकुर सदाव्रताचे बेगमीबद्दल चालवणे. प्रतिवर्षी नतन पत्राचा आक्षेप न करणे. या पत्राची प्रत लिहून घेऊन अस्सल पत्र भोगवटियास याजवळ परतोन देणे. पैका घेतला असला तरी फिरोन देणे. जाणिजे. छ २४ जमादिलावल, सुरुसन सबा खमसैन मय्या व अल्लफ. बहुत काय लिहिणं. हे विनंति. [५२] १६ फेब्रुवारी १७५७. अपत्ये रघुनाथाने स॥ नमस्कार. विज्ञापना. येथील क्षेम ता॥ छ २६ जमादिलोवल पावेतों यथास्थित असो. विशेष. आजी छ २४ रोजी इंदुरास आलो. रा. मल्हारजी होळकर याची भेटी जाली. पुढे दरमजल दिल्लीस जात असो. अबदाली दिल्लीस आला, यास्तव चहूंकडून राजे व जमीदार व रांगडे लोकांच्या नजरा फिरल्या. सांप्रत भलता एखादा मनसुबा करून मुलूक अथवा रुपये मिळावयाची सोय दिसत नाही. जेव्हां अबदाली, पारपत्य होईल तेव्हांच वरकड दवतील व हर एक मनुष्यास सोई पडेल. अबदालीचें पारपत्य करावें तरी फौज अद्यापि जमा जाहली नाही. देखील १०९ सुद्धां. ११० हे पत्र रघुनाथरावाने १७५७ च्या मोहीमेत हिंदुस्थानांत जातांना लिहिले. १७५७ च्या प्रारंभी नानासाहेब श्रीरंगपट्टणास होते.