पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/216

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

खर्चाप्र॥ बोली करून त्याजपासून चाकरी घेऊन याचे उर्जित होय ते सर्व केले पाहिजे. ॥ छ २१ रजब. बहुत काय लिहिणे. हे आशीर्वाद. लेखन सीमा सांब --- [५] ॥ श्री ॥ १४ फेब्रुवारी १७५७. राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसी:पोण्य बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणे. विशेष. कुंजबिहारी बैरागी, मनसुकदाप्तबावा महापुरुष यांचे नातू , वास्तव्य कसबे कडा, यांनी हुजूर कपिलसिंगम श्रीकृष्णातीर येथील मुक्कामी येऊन विनंति केली की अहंमदशहा पातशहा. यांणी आपणास मौजे शिराथू देखील मजरे खाजगीपूर, ता. हवेली कडा, सरकार मजकूर, सुभे प्रयाग, हा गांव दरोबस्त सदाव्रताचे बेगमीसः दिला. त्याचे परवाने मनसूरअल्लीखान वजीर व खानखाना कमरुद्दीखान यांचे आहेत. यास मौजे 'मजकूरचा अंमल आपणाकडे मोगलाई अंमलांतः चालत आला. सरकारांत अंमल झाल्यापासून चालत नाही. यास्तव स्वामींनी कृपाळू होऊन पेशजीचे परवाने आपले जवळ आहेत ते मनास आणून सदहू गांव दरोबस्त आपणाकडे सदाव्रताचे खर्चाबद्दल करार करून द्यावा ह्मणून. त्याजवरून पेशजीचे परवाने मनास आणून कुंजबिहारी बैरागी हे मनसुख १०७ जिंकलेल्या प्रदेशांतील लोकांची इनामें, सदावर्ते, इत्यादि पेशवे जशीच्यातशीच राखीत असत हे ह्या पत्रावरून कळून येईल. असली बरीच पत्रे आमचे जवळ आहेत, पैकी मासल्याकरितां हें एक दिले आहे. । १०८ रायचूरच्या उत्तरेस आठ कोसांवर कृष्णा व भीमा यांचा संगम. .