पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/215

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

॥ श्री ॥ १२ जून १७५५. राजश्री गोपाळराव गणेश गोसावी यांसिः (७ अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री जयाजी शिंदे दंडवत विनति यथील कुशल तागाईत छ १ माहे रमजान जाणोन स्वकीय कुशल लेखन करीत गेले पाहिजे. विशेष. पत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहले. तेथें मजकर कितेक तपशिले खासगत स्वाराच्या सिबंदीविशीचा मजकूर फारच लिहिला जे श्रीमंत साहेबास हिशेबाविशी पत्र पाठविले ह्मणजे आपला गळा उगवतो ह्मणोन लिहिले. त्याजवरून श्रीमंतास विनंतिपत्र पाठविले असे. हे त्यास प्रविष्ट करून आपले काम हिशेबाकितेबाचे असेल त्याप्रमाणे अर्ज हजर करून करून घेणे. र। छ मजकूर. बहुत काय लिहिणे. हे विनति. शिक्का मोर्तुब सुद ॥ श्री॥ राजश्री मल्हारजी होळकर गोसावी यांसि: (सकलगुणालंकरण अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री स्ने॥ रघनाथ बाजीराव आशीर्वाद. उगरि येथील कुशल जाणोन स्वकीय लि. हीत असिले पाहिजे. विशेष. राजश्री गोपाळराव गणेश याची सोय यंदा सरकारांतून कांहीं जाहली नाही. यास्तव याचे बंधू राजश्री कृष्णराव गणेश पागा घेऊन आपलेकडे आले आहेत. तरी यास चाकरीस ठेवून पागेच्या १०६ ह्या पत्राचें साल कोणतें त्याचा अंदाज होत नाही. गोपाळराव गणेशाच्या मोहिमांया सालवार व तारीखवार इतिहास मिळाल्यावाचून हा अंदाज होणार नाही.