पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/214

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६९ ब मुनशीए सरकार रामराम बीरसद. मजमूने खतरा बसमय रावसाहेब रसानीदा जवाबे बासवाब बकलमारंद व अज नामे खुद मुतला सौजद. १०५ हे बातमीचे पत्र दिल्लीतील कोणी मुनशाने पेशव्यांच्या कोण्या सरदाराला पाठविले आहे. पत्रांत मुनशाचेंहि नांव नाही व सरदाराचेंहि नांव नाही. तत्रापि हे पत्र पूर्वेकडील कोण्या सरदाराला पाठविले आहे, इतके आंतील मजकुरावरून स्पष्ट आहे. ह्या सरदाराचे ठाणे दिल्लीपासून जवळच कोठे तरी असले पाहिजे; कारण, पत्र लिहिणारा मनशो आपल्या मुलाला ह्या सरदाराकडे पाठविणार होता. शिवाय ह्या पत्रांत, रघुनाथरावदादा, मल्हारराव होळकर, जयाजी व दत्ताजी शिंदे, कृष्णराव बल्लाळ, जनार्दनपंत फडणास, अंताजीमाणकेश्वर, नानासाहेब पेशवे, विश्वासराव, माधोसिंग, विजेसिंग, सुरजमल्ल जाट, रूपरामकटारा, लखीजंगलचा अलासिंघ, गाजुद्दिन, नजीबखां रोहिला, स दल्लाखान, दुदेखान, हफीज रहिमतखां, अहमदखां बंगष, समतखां, जहानखां, तैमूरशहा व अहमदशहा अबदाली, सलाबतजंग, निजामअल्ली व मीरमोंगल, इतक्या व्यक्तींचा ह्मणजे त्यावेळी हिंदुस्थानांत प्रसिद्ध असलेल्या बहुतेक व्यक्तींचा उल्लेख केला आहे. फक्त दिल्लीच्या पूर्वेकडील ह्मणजे बुंदेलखंड व अंतर्वेद ह्या प्रांताकडील व्यक्तींचा मात्र बिलकुल उल्लेख नाही. ह्यावरून ज्याला पत्र लिहिले त्याला ह्या दोन प्रांतांतील माहिती चांगली असून पश्चिमोत्तर हिंदुस्थानांतील व दक्षिणेकडील माहितीची मात्र अपेक्षा होती असें दिसते. शिवाय हा सरदार दादासाहेबांहून दर्जाने कमी होता असेंहि अनुमान आंतील मजकुरावरून होते. मुनशाने ह्या सरदाराला “ रावसाहेब" ह्मणून पहिल्या मायन्यांत म्हटले आहे ; परंतु, “ किन्ला मद्दजिल्लहू " ही विशेषणे त्याच्या नावापुढें जोडली नाहीत. रघुनाथरावदादा, नानासाहेब पेशवे व विश्वासरावसाहेब ह्यांच्या नांवांपुढे " किल्ला मद्दजिल्लहू " हे विशेषण लावावयास मुनशी ह्या पत्रांत कोठेहि विसरला नाही. त्याने रघुनाथरावाला खदावंद म्हणून ह्या सरदाराला रावसाहेब ह्मटले आहे. शेवटी आशीर्वादहि दिला आहे. तेव्हां हा सरदार मराठा किंवा ब्राह्मण असावा. दिल्लीच्या पलीकडील अंतर्वेदीतील उत्पन्न ह्या सरदाराकडे असावें, ह्यावरून हा सरदार गोविंदपंत बुंदेले असावा असा तर्क होतो; ह्या पत्राचे शब्दश: भाषांतर दिलेले नाही; सारांश दिला आहे. शेवटल्या प्यान्याचा सारांश मुळीच दिला नाही. हा सारांश पुणे येथील महाराष्ट्र कालेजांतील फारशी भाषेच्या अध्यापकांच्या साहाय्याने काढिला आहे.