पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/204

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

॥श्री॥ १५ जानेवारी १७५५. राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री बाबूरावजी स्वामीचे सेवेसी: सेवक रामाजी अनंत स॥ नमस्कार विनति येथील कुशल त॥ छ २ ॥खर मु॥ नोंगेर प्रांत मारवाड जाणून स्वकीये कुशल लेखन करीत गेले पाहिजे. विशेष. पत्र पाठविलें तें पावले. तेथे लिहिले वृत्त त॥वार कळलें. फारसी कागद तुमचंच नांवे लिहून नवाब सुजातदौलाबहादर यांसी पाठविला असे. व बकसीराम याने तुमच्या इतल्याखेरीज हरयेक कामकाज न करणें ऐसे पत्र त्यास लिहिले आहे. त्या प्रे॥ त्यास देणे आणि श्रीमंत राजश्री दादासे॥च्या आज्ञे प्रे॥ वर्तत जाणे ह्मणजे उत्तम असे. तुह्मी आह्मास वारंवार लिहितां परंतु आह्मी इकडे आलो. तुह्मी तिकडे राहीला. राजश्री गोपाळराव कुंभेरीस आले होते त्याचे साइत्य ईश्वरें केलें. तुमचा भोग सरला नवता ! बरें ! आतां श्रीमंतासमागमें देशास यावें. घर सोडून फार दिवस जाहाले. पुढे मागती गोपाळराव तुझी सारेच काशीस याल. कांही चिंता न करावी. बहुत काय लिहिणे. लोभ असो दीजे. हे विनंति. [१५] ॥श्री॥ २० जानेवारी १७५५. राजश्री बाबूराव महादेव गोसावी यासिः-- ७ अखंडित लक्ष्मी आलंकृत राजमान्य राजश्री जयाजी शिंदे दंडवत सु॥ खमसखमसैन मया व अलफ राजश्री गोपाळरावजी हुजूर आझा जवळ आले. त्यांनी कितेकाप्रकारचे तुमचे चाकरीचें वर्तमान सांगितले. त्यावरून कळेल. ऐशास, तूर्त तुह्मी श्रीक्षेत्रास असणे. इकडे यावयाची तातड सहसा ९९ २५ जानेवारी १७५५ सनागोरचा वेढा चालला होता.