पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/203

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सेवक रघुनाथ बाजीराव नमस्कार सु।। खमसखमसैन मया व अलफ. तुह्मीं पत्र पाठविलें प्रविष्ट जाहलें. लिहिला मजकूर कळला. याजउपरि जाहलें वर्तमान लिहित जाणे. येथील कामकाजाचा निर्गम जाहला. जाणिजे. छ २४ मोहरम. लेखन सीमा [४३] ॥ श्री॥ १५ जानेवारी १७५५. राजश्री बाबूराव महादेव गोसावी यांस: ७ अखंडित लक्ष्मी आलंकृत राजमान्य ते।। जयाजी शिंदे दंडवत. सु॥ खमसखमसैन मया व अल्लफ. तुझी पत्र पाठविलें तें पावले. तपसीलवार वर्तमान लिहिल्याप्रमाणे कळों आले. मनसूरअलीखान याच्या पुत्रास शिष्टाचार युक्त पत्र फारसी पे॥ असे. हे त्यास देणे. आणि श्रीमंत राजश्री दादासाहेब तुह्मास आज्ञा ज्याप्रमाणे करतील त्याप्रमाणे वर्तणुक करणे. लालाबकसीराम यास ताकीद द्यावीसें लिहीलें त्यावरून त्याजला लिहिले. असे की तुझी उभयता येक चित्तें वर्तोन राहत जाणे. द्वैत न दाखवणे. ऐसें त्यास लिहिले असे. तरी बकसीराम व तुह्मी येक विचारें राहून हरयेक कामकाज करीत जाणे. जाणिजे. छ २ साखर बहुत काय लिहिणे. हे विनंति. मोर्तब सुद ___९७ येथील म्हणजे दिल्ली येथील. रघुनाथराव १७५४ च्या आगष्टांत दिल्लीस पोहोंचला होता ( पत्रे व यादी ३२). ९८ सफदरजंग अथवा मनसूरअल्लीखान हा १७ अक्टोबर १७५४ त वारला. त्याच्या पुढे त्याचा पुत्र सुजातदौला अयोध्येचा नवाब झाला.