पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/202

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तुझी पाठविलें तें पावलें. मार्गी आगरीयासी जाटांनी लुटले. दुसरें चवरीबइल गंगावनें पाठविली आहेत ह्मणोन लिहिले. त्यास, हुजूर आलियावरी जाब लिहिला जाईल. राउत सीबंदी आहे. त्याची सनद पाठवावी ह्मणोन लिहिलेत त्यास, पेशजी गोपाळराव गणेश याणी तुझास नेमणुक करून दिल्हीच आहे. त्याची सनद हुजूरची असावी. त्यास, खासास्वारी त्या प्रांतास आलियावरी मनास आणून आज्ञा करणे ते केली जाईल. हल्ली सफदरजंग कोठे आहेत ? पुढे इरादा त्याचा काय ? हे सविस्तर वरिचेवरी लिहीत जाणे. साठ हजार रुपये धनवडसींगापासोन तनखाचे ऐवजी पावले ते त्याणींच मार्गात दगा करून घेतले. याजकरितां जजावल ? सफदरजंगाचे तुही धनवडसिंगावरी केले आहेत. त्यास ते रुपये आले किंवा नाही हे लिहीणे. जाणिजे. छ १५ जिल्हेज. लेखन सीमा [ ४१] ॥ श्री॥ १८ अक्टोबर १७५४. राजमान्य राजश्री वाबूराव महादेव दि॥ गोपाळराव गणेश यांसः सेवक रघुनाथ बाजीराव नमस्कार सु॥ खमसखमसैन मय्या व अल्लफ. तुझी पत्रे दोन पाठविली, पावली. लिहिले वृत्त सविस्तर कळलें. सफदरजं. गाचें वर्तमान लिहिलें तेंहि कळले. याजउपरि नवाब सुजातदौला काय विचार आचार करितात ? मनसबा डामडौल कसा आहे ? हे वरचेवरी सविस्तर लिहून पाठवीत जाणे. जाणिजे. छ १ मोहरम. लेखन सीमा [४२] १० नोवेंबर १७५४. राजमान्य राजश्री बाबूराव महादेव दि॥ गोपाळराव गणेश गोसावी यासि: