पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/201

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ऐसीयास, आह्मी दिल्लीच्यों कामांत नाही. दिल्लीचें जें बरें अगर वाईट तें सर्व श्रीमंताकडे व राजश्री सुभेदाराकडेच आहे. आह्मी प्रस्तुत मारवाडच्या कामास आलो आहों. ईश्वरी कृपेनें ईकडील कॉम सिद्धीस गेलियावर त्या प्रांते येऊन. आबांचा ? आमचा स्नेह आहे त्या प्रे॥च आहे. दुसरा विचार नाही. तुह्मी कोणे गोष्टीची चिंता न करणे. बक्षीरामाचा मजकूर लिहिला तरी त्यांनी सनदेसिवाय खर्च केला तरी मजुरा पडणार नाही. तुह्मी श्रीमंत राजश्री दादास्वामीसहि वरचेवर लिहीत जाणे. तेथून ताकीदपत्रे पाठवितील. येथील पत्रे पाठविलियाने काय होणेजेव्हां त्या प्रति फौज येईल तेव्हां सारेंच उत्तम होईल. बहुत काय लिहिणे. लोभ असो दीजे. हे विनंति. ॥श्री॥ ३ अक्टोबर १७५४. राजमान्य राजश्री बाबूराव महादेव गोसावी यांसः-- सेवक रघुनाथ बाजीराव नमस्कार सु॥ खमसखमसैन मया व अलफ. तुह्मी पत्र पाठविलें प्रविष्ट जालें. लिहिले वर्तमान सविस्तर कळले. गंगावन ९५ ह्या लिहिण्यावरून कुंभेरीस बखरीत (भाऊसाहेबांची बखर पृष्ठ ७). लिहिल्याप्रमाणे शिंदे होळकरांचे भांडण झाले होते असे म्हणण्यास फारशी हरकत नाही. आतां भांडण्याचे स्वरूप बखरीत वर्णिलेल्याप्रमाणेच होते किंवा काय ह्याचा मात्र उलगडा अन्य पुरावा सांपडल्या शिवाय करता येत नाही. ९६. बंगाल्यावर स्वारी करण्याचा उपदेश शिंद्यांना मल्हाररावहोळकराने १७५८ त दिला असें भाऊसाहेबांची बखर पृष्ठे ४०।४१ त वर्णन केले आहे. परंतु पूर्वेकडे स्वारी करून श्रीक्षेत्र काशी घेण्याचा शिंद्याचा इरादा निदान १७५४ पासून होता असें ह्या पतावरून दिसते.