पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/200

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७५ ॥श्री॥ २२ आगष्ट १७५४. राजमान्यराजश्री बाबूराव महादेव दि॥ गोपाळराव गणेश गोसावी यांसिः सेवक रघुनाथ बाजीराव नमस्कार सु॥ खमसखमसैन मया व अलफ. तुझीं एक दोन पत्रे पाठविलीं, प्रविष्ट जाली. लिहिले वर्तमान सविस्तर कळले.याजउपरि जालें वर्तमान वरचेवरी लिहीत जाणे. सांप्रत सफदरजंग कोठे आहे. त ? मनसबाविचार आचार काय आहे ? हे वृत्त सविस्तर बारीक मोठे मनास आणोन लिहिणे. पोथ्याविसी पेशजी लिहिले आहे. त्याप्रमाणे पुस्तकें तयार करून पाठविणे. तुह्मीं सफदरजंगाचा निरोप घेऊन देशास जाणार. याजकरितां गोपाळराव यांनी रामचंद्रभिकाजीस पाठविले. त्यास, तुह्मी व ते एक विचारें राहून कामकाज करीत जाणे. येविशी रामचंद्र भिकाजीसहि पत्र सादर केले आहे. जाणिजे. छ ३ जिलकाद. आज्ञाप्रमाण. लेखन सीमा [३९] ३ ॥ श्री॥ २९ आगष्ट १७५४. राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री बाबरावजी स्वामी गोसावी यांसः-- सेवक रामाजी अनंत स॥ नमस्कार विनंति येथील कुशल त॥ छ २९ सवाल मु॥ मेडते प्रांत मारवाड जाणून स्वकीये कुशल लेखन करीत गेलें पाहिजे. विशेष. पत्र पाठविलें तें पावलें. लिहिले वृत्त कळलें. येणे प्रमाणेच सदैव वृत्तांत त॥ वार लेहून प॥ जाणे. तुह्मी दिल्लीचा मजकूर लिहिला.