पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/199

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७४ ॥ श्री॥ १९ आगष्ट १७५४. राजश्री बाबूराव महादेव गोसावी यांसी: छ अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री जयाजी शिंदे दंड वत. सु॥ खमसखमसैन मया व अलफ. तुझी पत्र पाठविलें तेथें श्रीक्षेत्रीचें व अंतर्वेदीप्रांत व मनसूरअल्लीखान याजकडील वर्तमान तपशिलें आषाढमासचें लिहिलें तें कळले. त्या प्रांतें फौज आल्याविना सरकारचा अंमल बसत नसे ह्मणून लिो. त्यास, सांप्रत आह्मास श्रीमंत राजश्री दादासाहेब यांणी गुजराथची फौज दहाबारा हजार देऊन मारवाड प्रांतें रवाना केले. ते छ १६ सवालों मेडत्यास आलो. राजे रामसिंग राठोड याचे लोक यांसी येऊन भेटत चालले. आजपर्यंत बारा पंधरा हजार फौज राठोड जमा जाले. आणखी येतच आहेत. बिजेसिंग राठोड मेडत्यांतच दबोन राहिला असे. आमी बाहेर त्याजभोंवताले असो. त्याचे लोक नित्यानी पळोन आपल्याकडे येत चालले आहेत. धर सुटला असे. सत्वरींच मारवाड प्रांतीचे काम विल्हेस लावून, बंदोबस्त करून, तुह्मांकडे अंतर्वेदींतून अविलंबेंच येतो. जे जे मवासी करीत आहेत त्यांचे पारपत्य यथायुक्त करून श्रीक्षेत्रास अंमल खुलासा करणे हे गोष्ट चित्तांत फारशी आहे. सत्वरीच येणे होईल. चिंता न करणे. जाणिजे. छ २९ माहे सवाल. बहुत काय लिहिणे. हे विनंति. या शिक्का मोर्तब सुद ९४ जयाजी शिंदे दादासाहेबांच्या सैन्यांतून मारवाडास जाण्यास १०रमजान म्हणजे २ जुलै १७५४ स विभक्त झाले ( पत्रे व यादी ३२ ). ते १६ सवाली म्हणजे : आगष्ट १७५४ स मेडत्यास पोंचले. हे पत्र १९ आगष्टाला मेडत्याच्या भोंवतीं जयाप्पाने वेडा दिला असतां लिहिलेले आहे.