पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/198

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

थैली पाठविली आहे, त्यास प्रविष्ट करोन प्रत्योत्तर घेऊन पाठविणे. जाणिजे. छ २३ रजब. आज्ञा प्रमाण. लेखन सीमा शिक्का ॥श्री ॥ ४ आगष्ट १७५४. राजमान्य राजश्री बाबूराव महादेव दि॥ गोपाळराव गणेश गोसावी यांसिः सेवक रघुनाथ बाजीराव नमस्कार सु॥ खमसखमसेन मया व अलफ. तुहीं पत्र पाठविलें प्र॥ जालें. पे॥ अरले व पे।। कथीत तालुका विजापूर येथील मामलत राजश्री व्यंकाजी रंगनाथ याजकडे आहे. त्यास महमदकुलीखान प्रयागचा सुभा खळ करितो. त्यास ताकीद सफदरजंगापासून करावयाबद्दल साहित्य पत्रे हुजूरची पाठवावी व कांहीं फौज देऊन याचा उपराळा करावा ह्मणून तुह्मीं विनतिपत्रीं लिहिलें तें कळलें. अशास, साहित्य पत्रे सफदरजंगास व मानाजी पायगुडे व गोविंद बल्लाळ यांसी उपराळा करावा याबद्दल लिहिले आहे. तुह्मी नवाबापासोन महमदकुलीखान यासी ताकीद करविणे. मवासाचे पारपत्य करावयाचा उपराळा गोविंद बल्लाळ व मानाजी पायगुडे करतील. मह्मदकुलीचा उपसर्ग, धनवडसिंगाचा उपसर्ग न करणें ऐसी ताकीद सफदरजंगापासोन करणे. जाणिजे. छ १४ सवाल. भाज्ञाप्रमाण. लेखन सीमा लढाई चालविली होती. परंतु गाजुद्दिनाच्या बाजूला मराठे होते व त्यांनी जाटाचा पराभव केला होता. तेव्हां सफदरजंग अर्थातच एकटा राहिला. अशा समयीं पत्राचा दपटशा गेला असतां तो काशी बाबूराव महादेवाच्या हाती देईल ह्या उमेदीने हे पत्र लिहिले आहे.