पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/197

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७२ जाहाला. ऐशास, तुम्ही कर्ते, यशस्वी आहां; कामाकाजास पाठविल्यास यशच मिळवाल हा भरंवसा चित्तांत जाणोन खावंदचाकरीस शिपाईपणाची शर्त केली आणि चिरंजीवपणाचे नाव रक्षिलें. बहुत समाधान जाहालें. या उपरि पुढोह सवाई यश संपादाल यांत संशय नाही. उप्रांत पुढील विचार तर तुली एकाएकी त्याजवर चढून न जाणे. तेच कदाचित् चढून आल्यास ठाण्याबाहेर मोर्चे बंदी करून राहावे. आणिक मागाहुन कुमकहि पाठवून देऊ; चिंता न करणे. जेणेकरून खावंदाचा नक्ष राहे तें करावें. यमतुका ? कडील आज प्रहर दिवसास पत्रे आली तेथे लिहिले होते की जमीदाराकडील भीड ? प्यादे होते ते सर्व याजकडे मिळाले. जमीदाराचा भरवसा नाही. आपले हुजुरातचे स्वार दोनतीनशे आहेत. ते थोडेच आहेत. त्यास चिंता नाही. आणीकहि कुमक जगदाप याजकडे पाठवावी लागते. ऐशास, आज संध्याकाळ पावतो पाठवून देतो. तिकडून तुह्माकडे येतील. आज येथून कूच करून नारोशंकर याच्या गोटाजवळ मुक्काम केला. बहुत काय लिहिणे. तुह्मीं शर्त केली ! बरे! तमची आमची भेट झाल्यावर सर्व गोष्टी ईश्वर उत्तम करील. काही चिता नाही. बहुत शहाणपणे राहावें. बहुत काय लिहिणे. हे आशीर्वाद. -- - [३५] ॥ श्री॥ १७ मे १७५४. राजमान्य राजश्री बाबूराव महादेव नि॥ गोपाळ गणेश गोसावी यांसिः सेवक रघुनाथ बाजीराव नमस्कार सु॥ आर्बा खमसैन मयावअलफ. सांप्रत येथील मजकूर. नवाब मेनसूरअल्लिखान यास जाटाचं फत्तेचें पत्र ९३ सफदरजंग ह्याला मनसुर अल्लीखान हे नांव होते. त्याला जाटाच्या फत्ते, ह्मणजे कुंभेर घेतल्याचे पत्र रघुनाथरावाने पाठविलें. अशा करितां की ही बातमी ऐकून त्याने नरम यावें. सफदरजंगाचे व सुरजमल जाटाचे सख्य होते. ह्या दोघांनी गाजुद्दिनाविरुद्ध