पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/196

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[३३] पे॥छ ५ रजब. . ॥ श्री॥ ११ एप्रील १७५४. राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री बाबूरावजी स्वामी गोसावी यांसःपोण्य रामाजी अनंत स॥ नमस्कार विनंति येथील कुशल तागायत चैत्रवा ४ मु॥ प्रांत जाटवाडा ठाणे कुंभेर जाणून स्वकीये कुशल लेखन करीत गेले पाहिजे. विशेष. पत्र पाठविलें तें पावलें. तेथें कितेक मजकूर. नबाबाच्या शैन्यांत आल्यानंतर त्यासी बोलाचाली जाल्याचे वृत्त ता॥वार लिहिलें तें कळलें. ऐशास, त्याचा जाबसाल श्रीमंत राजश्री दादासाहेब तुह्मास लिहितील त्यावरून कळेल. त्याच्या आज्ञेप्रमाणे वर्तणूक करणे. सारांश गोष्ट की तुमचें तेथें प्रयोजन नसिले तरी मग उगेंच तेथे राहावेसें काय आहे ? येथें खावंदाजवळी येऊन वर्तमान सांगावें. मग पुढे जशी आज्ञा करतील त्याप्रमाणे वर्तणूक करावी. कागदीपत्रीं कांहीं काम होते असा अर्थ नाही. राजश्री गोपाळराव कौलेस आहेत. तुझास कळावें ह्मणून लिहिले आहे. बहुत काय लिहिणे. लोभ असो दीजे. हे विनंति. [ ३४ ॥ श्री॥ १५ मे १७५४. चिरंजीव राजश्री गोपाळराव यांसी प्रती गोपाळराव गणेश आशीर्वाद उपरि येथील कुशल ता॥ छ २१ रजब जाणोन स्वकीये लिहीत जाणे. विशेष. तुही पत्र पाठविलें तें पावलें. लिहिलें वर्तमान विदित जाहालें. उंटे, नोबत व घोडी पाडाव करून आणिली म्हणोन लिहिलें तें कळलें; बहुत संतोष ९१ ह्या वेळी कुंभेरचा वेढा चालला होता. ९२ हा गोपाळराव कोण व ही कोणत्या लढाई संबंधी हकीकत आहे ते सांगता येत नाही. हा गोपाळराव गोपाळराव गणेशाचा संबंधी असावा एवढे मात्र पत्रावरून दिसते.