पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/195

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

डोन नवाबास अर्जी लेहविली. परंतु त्याजवरच मदार नाही. राव मशारनिलेम अंतर्वेदीत मामलत सांगोन पाठविले. तेथील बंदोबस्त करून मशारनिले येथे लवकरच येतील. उपरांतिक पका विचार होणे तो होऊन येईल. तुह्मी आपली खातरजमा राखोन कोणेविसी चिंता न करणे. येविसी श्रीमंतांनी तुह्मास लिहिले असेल त्याजवरून कळेल. ज्या प्रे॥ श्रीमंतांची आज्ञा होईल त्या प्रे॥ च वर्तणूक करावी. येथील सर्व वर्तमान तुह्मी जाणतच आहा. बरें, इतके दिवस झाले. आतां थोडक्यासाठी उतावळी न करावी. हे या प्रांतांत आहेत तों पावेतों वाट पाहावी. नाहीं तरी मग पुढे जे होईल ते पाहतच आहों. बहुत काय लिहिणे. लोभ असो दिजे. हे विनंति. [३२] पै॥ छ ५ रजब. ॥श्री॥ १० एप्रिल १७५४. राजश्री बाबूराव महादेव गोसावी यांसिः-- ॐ अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री जयाजी शिंदे दंडवत. सु॥अर्वा खमसैन मया अलफ. तुझी पत्र पाठविलें तें पावले. तेथें नाबखान लष्करांत आल्यावरी, त्यासी संभाषण केल्यावरी त्याच्या जाबसालाचे वृत्त तपशिले लिहिलें तें सविस्तर कळलें. ऐशास, येविसी जे लिहिणे तें श्रीमंत राजश्री दादासाहेब यांणी तुह्मास लिहिलेच आहे. त्याप्रे॥ वर्तणूक करण. जाणिजे. छ १६ माहे जमादिलाखर. बहुत काय लिहिणे. हे विनात. शिक्का मोर्तब सुद. सावजनिक बायालर ९. हा नवाबखान कोण ?