पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/194

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[३०] ॥श्री॥ ९ मार्च १७५४. राजश्री बाबूराव महादेव गोसावी यांसिः अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री जयाजी शिंदे दंडवत. सु॥ अर्बा खमसैन मयावअलफ. तुझी पत्र पाठविलें तें पावलें. सविस्तर कळलं. ऐशियास, राजश्री गोपाळराव गणेश येथे येऊन सविस्तर वर्तमान श्रीमंत राजश्री दादास्वामीस निवेदन केले. तदनुसार तिकडील बंदोबस्त होणे तो थोडक्याच दिवसांत होऊन येईल. तुर्त मानिलेस अंतर्वेदीत सरकार कोळे येथील मामलत सांगोन पाठविले असेत. त्यांणींहि तुझास सविस्तर लिहिले असेल. तुह्मीं कोणे गोष्टीची चिंता न करणे. जाणिजे. छ १४ जमादिलावल. बहुत काय लिहिणे, हे विनंति. शिक्का. मोर्तब सुद. [३१] पै॥ छ १ जमादिलाखर. ॥ श्री ॥ २६ मार्च १७५४ पैवस्ती. राजश्रियाविराजित राजमा न्यराजश्री बाबूराव स्वामीचे सेवेसी:सेवक रामाजी अनंत साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत जाणे. विशेष, तुझी पत्र पाठविलें तें पावोन लिहिले वर्तमान सविस्तर कळलें. ऐशियास, तुमचा उपराळा करून श्रीचे काम शेवटास न्यावें यापरतें दुसरें अधिकोत्तर नाही. त्या प्रे॥ येथे राजश्री गोपाळराव आलियावर श्रीमंतास व सरदारांस जे विनंति करण्याची ते केली. व येथून नवाब सफदरजंग यास लेहून त्याजकडून वकिलास सांगोन त्याजक ८८ जयाप्पा व मल्हारराव दादासाहेबांपाशीं कुंभेरीस असतांना हे पत्र लिहिले आहे (लेखांक ३३ पहा) ८९ कोकजळेश्वर.