पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/193

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[२९] ॥ श्री ।। ७ मार्च १७५४. राजमान्य राजश्री बाबूराव महादेव दि॥ गोपाळराव गणेश गोसावी यांसिः-- सेवक रघुनाथ बाजीराव नमस्कार. सु॥ अर्बा खमसेन मया व अलफ. तुही पत्र पाठविलें, प्रविष्ठ जालें. सफदरजंग श्री क्षेत्रींचे अमलाची परवी होऊ देत नाही, हा मजकूर विस्तारें करून लिहिला तो कळला. ऐशास, येथील उपराळा ठरावयाचा मजकूर लालानरसिंगदास यास ताकीद कर्तव्य ते करीत आहों. परस्पर ते सफदरजंगास लिहीतच असतील. तुझी त्यासी शोरश्य राखोन अंमलाची पेरवी होय ते करणे. जरी अमल ते चालो न देत तरी तुझी आमाकडे उठोन येणे. पांच शिरोमणी व पद्मपुराण संपूर्ण व यजुर्वेदभाष्य व सामभाष्य हे तुह्मी लिहिविले आहेत. ते तयार जाले असले तरी पाठवणे. तयार जाले नसले तरी खामखा तयार जलदीने करविणे. पुस्तकें तयार जाल्याशिवाय क्षेत्रींहून न निघणे. जाणिजे. छ १२ जमादिलावल आज्ञाप्रमाण. पुस्तकाची जरूर दरकार आहे तरी तुझी खामखा श्रीस जाऊन लेहून घेऊन येणे. त्याखेरीज आल्यास बरे नाही. आणि श्रीचे अमलाविसी जसें केलेले तसे बोलून जाहलें तरी करणे. वर्तमान लिहीत जाणे. लेखन सीमा - ८७ ह्यावरून सफदरजंगाने १७५४ साला पूर्वी काशी क्षेत्री अंमल बसवून देण्याचे कबूल केले होते असे दिसते; परंतु श्रींत अंमल बसविण्याकरितां बाबूराव महादेवास जेव्हां पेशव्यांनी पाठविले तेव्हां तो अळमटळम करूं लागला. जयाप्पाच्या मनांत श्रींत अंमल वसविण्याचे फार होते हे पुढील काही पत्रांवरून दिसून येईल; परंतु पुढे लवकरच १७५५ त जयाप्पा वारल्यामुळे काशीकडे मोहीम करण्याचें तहकूब राहिलें तें दोन तीन साले तसेच राहिले. नंतर १७५८।५९ त दत्ताजी शिंद्यांच्या मनांत काशी घ्यावयाचे आले; परंतु अबदालीच्या दंग्यामुळे व पानिपतच्या गर्दीमुळे ते काम तहकूब करावे लागले. पुढें केव्हांहि मराठ्यांच्या हातीं तें क्षेत्र आले नाही.