पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/192

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[२८] ॥ श्री ॥ २८ अक्टोबर १७५३ राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोपाळराव गणेश स्वामी गोसावी यांसिःपोण्य रघुनाथ बाजीराव नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जाणे. विशेष. सरकारांत पुस्तकाचे प्रयोजन आहे. त्यास, पुस्तकें बितपशिल:शिरोमणी सांख्यसूत्र व भाण्यप्रस्थान १ लीलावतीशिरोमणी १ सूत्रे १ बौध्याधिकारशिरोमणी १ भाग्य १ प्रत्यक्षशिरोमणी स्मृती:१ गुणशिरोमणी मनुस्मृति, याज्ञवल्क्य, पाराशर वगैरे १ पदार्थखंडणशिरोमणी स्मृति १८ वेदभाष्य चहूंवेदींचें त्यांत जे मिळेल तितकें येकूण कलम १ येणेप्रमाणे पुस्तकें मेळवून उत्तम अक्षर आणि वित्पन्न ब्राह्मणाचे हाते प्रती करून सदहूं पुस्तकें लेहून पाठविणे. जाणिजे. छ ३ जिल्हेज. बहुत काय लिहिणे हे विनंति. पै॥ छ १ मोहरम, कार्तिक श्रु॥ २ भानुवासर, द्वितीय प्रहर. मु॥ नजीक अवन्या प्रांत अंतर्वेद. ८६. शिरोमणीभट्टानें केलेला ग्रंथ तो शिरोमणी. हा ग्रंथ तर्कशास्त्रावरील आहे. मुळांत खाली दिलेले पांच शिरोमणी त्याचे भाग होत. मनु, याज्ञवल्क्य, नारद, विष्ण, शंख, आपस्तंब, इत्यादि १८ स्मृती. विद्यारण्याचे चारी वेदावरील भाष्य.