पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/191

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

राय वैसे येकदिल होय के सीरकारका कामकाज करना. बाबूरावके कहामाफीक तुमने रहना या मे अछा हे. यो बातका बुभाट आवे तो मुलाजा नु होगा. ताकीद जाणावी. जाणिजे. छ ४ रबिलावल. आज्ञाप्रमाण. लेखन सीमा [२७] ॥ श्री॥ ३ सप्टेंबर १७५३. राजश्री गोपाळराव गणेश स्वामी गोसावी यांसिःविनंति उपरि- थालनेरीहून भाद्रपद शुद्ध त्रयोदशीस खासास्वारी मुहूर्ते डेरे दाखल होईल. पुढे मजल दरमजल उभयता सरदार सहवर्तमान फौजेनिसी हिंदुस्थान प्रांतीं येत असो. याजउपरि इकडील कांहीं गुतौं राहिला नाही. तुझी आपल्याकडील वर्तमान वरचेवरी लिहीत जाणे. जाणिजे. छ५ जिलकाद. ते प्रांतीं लौकरच येतो. सर्व बंदोबस्त होऊन येईल. हे विनंति. पत्राच्या खरेपणाचा संशय येतो. कदाचित् नक्कल करणाऱ्याचा संवत् लिहितांना हस्तदोष झाला असावा. तरी मूळपत्र पाहिल्या शिवाय ह्या संबंधी ठाम असें कांहींच लिहितां येत नाही. ८०१० सप्टेंबर १७५३ ला रघुनाथराव थालनेराहून हिंदुस्थानास जाण्यास डेरेदाखल होणार होते. ८४ रणजे अमदाबाद सर करून गुजराथेचा बंदोबस्त झाला. ८५ श्रीक्षेत्र काशी व अंतर्वेदीतील स्थले ह्यांचा.