पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/190

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[२६] 'श्री ॥ १॥ ३० जानेवारी १७५० राजा शाहु नरपति हर्ष निधान बाळाजी बाजीराव प्रधान. आदनापत्र राजश्री पंडित मुख्य प्रधान वचनात. बकसीरामको मालम होय संमत १८११२ सुहुरसन खमसैनमयावआलीफ. तुम और पंडेत बाबू ८. इचलकरंजी येथील रा. रा. रघुनाथ पांडुरंग दातार यांच्या दफ्तरांतील लेखांक २६ पासून लेखांक ५० पर्यंतची पत्रे आहेत. लेखांक ४८ हे पत्र मात्र ह्या दफ्तरांतील नाही. रा. रघुनाथ पांडुरंग दातार ह्यांचे खापरपणजे बाबूराव महादेव दातार हे होत. हे गोपाळराव गणेश बर्वे ह्यांच्या दिमतीस होते. गोपाळराव गणेश बर्वे व त्यांचे बंधू ह्यांनी हिंदुस्थानांत वऱ्याच कामगिऱ्या केलेल्या आहेत असें अनुमान आहे. त्या कामगिऱ्या कोणत्या ह्याचा विशिष्ट निर्देश उपलब्ध असलेल्या कोणत्याहि महाराष्ट्राच्या इतिहासांत केलेला नाही. गोपाळराव गणेश, रामाजी अनंत, नारो शंकर, लक्ष्मण शंकर, अंताजी माणकेश्वर, खंडागळे, पांढरे, गोविंदपंत बुंदेले, विठ्ठल शिवदेव व त्यांचे बंधू, मल्हारराव होळकर, जयाप्पा, दत्ताजी, जनकोजी, इत्यादि अनेक महाराष्ट्रीय वीरांची व मुत्सद्यांची चरित्रं मुद्देसूद व तारीखवार अशी अद्याप लिहावयाचीच आहेत. गोविंदपंत बुंदेले, विठ्ठलशिवदेव, मल्हारराव होळकर, व शिंदे घराणे यांचे इतिहास लिहिले गेले आहेत. परंतु ह्या इतिहासांत व चरितांत मुद्देसूद, तारीखवार व विस्तृत अशी माहिती विलकुल नाही. ८१ शाहूमहाराज १७४९ च्या डिसेंबराच्या १५ व्या तारखेस वारले व हे पत्र नानासाहेव पेशव्यांनी अंतर्वेदोंतील बक्षीराम नांवाच्या जमीनदाराला ३० जानेवारी १७५० त लिहिले आहे. धाकटे रामराजे ह्यांचा अभिषेक ४ जानेवारी १७५० झणजे शके १६७१, शुक्ल ( विकारी ह्मणून धाकटे रामराजे ह्यांच्या चरित्रांत चुकून पडले आहे ) नाम संवत्सरे, पौष शुद्ध अष्टमीस झाला. तेव्हां हे पत्र शाहूराजाच्या मृत्यूनंतर ४५ दिवसांनी व रामराजाच्या आभिषेकानंतर २५ दिवसांनी लिहिले आहे. ह्यावरून रामराजाचा शिक्का अभिषेकानंतर २६ दिवस तरी चालू झाला नव्हता असे दिसतें. ८२ हे पत्र लिहिण्याच्या तारखेस सुहुरसन खमसैनांत विक्रमसंवत् १८०६ होता, १८११ नव्हता. हे पत्र खरे असल्यास संवत् चुकणे सर्वस्वी आश्चर्यकारक आहे. शाहूराजा वारला असतांहि त्याचा शिक्का चालविणे व संवत् चुकणे, ह्या दोन चुकांमुळे ह्या