पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/189

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हवेलीधाबेयावर चढून तमाशा पाहते. मोगलाई बुडोन राहिली. अतःपर फते रावसाहेबांची आहे. आजच मोगलाचा कुच जाला. अंधी आली. बाद केलें. दीन गाईब जाला. बावजबुन सुटला. गरद बहुत उठला. याचा विचार हाच की प्रस्तुत मोगल निघाले आहेत हे जिवंत नाहीं; मुर्दे जात आहेत. बारा कोसहि निभत नाहीं, आपआपल्यांत कटोन मरतील. निजामअल्ली व सलाबतजंग या दोघांतून येक जण पळोन रावसाहेबांचे आसरेयांत जाईल. यामध्ये खता नाही. आतां रावसाहेबीं ढील न करावी. दक्षणेचा बंदोबस्त करावा. आमचे दिलांत रावसाहेबांचें कदम पहावयाची उमेद. बहुत आहे: लेकिन बेसरंजाम आहों. मेहेरबान होऊन थोडाबहुत सरंजाम फर्मावितील तर जाऊन मुलाजमत करूं ह्मणोन बोलिले. हे वर्तमान हुजूर विदित व्हावयाकरितां विनंति लिहिली आहे. याचा विचार पाहतां मिरजाअबदला बहुत थोर आहे. शिकंदरचे घराणेयाचा खरा. मनसुबबाज, चतुर आहे. हुजूर दृष्टीस पडिलिया ध्यानास येईल. कृपाळू होऊन आज्ञा केली तर हुजूर येईल. बेखर्ची आहे. माणुस माकुल दिसतो. सेवेसी विदित व्हावयाकरितां विनंति लिहिली आहे. सेवेसी श्रृत होय हे विज्ञापना. HITE - - - "दिक्षणेचा बंदोबस्त करावा;" " दक्षण सारी मोकळी करावी," ही वाक्ये १७५० पासून १७६० पर्यंतच्या अवधीत महाराष्ट्रांत सर्वांच्या तोंडी झाली होती. सलाबतजंगाचे पारडे इतकें हलके झाले होते की, त्याच्या राज्यांतील मुलसमानास देखील मोगलांचे राज्य बुडते असे वाटू लागले; इतकेच नव्हे, तर ते बुडावे अशी इच्छाहि पुष्कळांस झाली. सलाबतजंगाच्या घरांत भावाभावांत कलह होता. शहानवाज खानासारखे राजद्रोही मुसलमान व जानबा निंबाळकरासारखे दुटप्पी मराठे सरदार त्याच्या दरबारांत होते; अशी स्थिति सलाबतजंगाची होती. तशांत चुसीसारख्या भुकेल्या परद्वीपस्थाच्या हाती राज्याची मुख्य सूत्रे होती. तेव्हां ह्या संधीस निजामाचें राज्य बहुतेक लयास जाण्याचीच वेळ आली होती, त्यांत कांहीं नवल नाही; परंतु इतकें होऊनहि सलाबतजंग वाचला तो एका गोष्टीने वाचला. ती गोष्ट ही की, बुसीला घालवून देण्याची बुद्धी त्याला ह्याच वेळी झाली. नाहीतर नानासाहेब व बुसी ह्या दोघांनी मिळून सलाबतजंगाची राळ उडवून दिली असती.