पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/188

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[२५] पै॥ छ २७ ॥खर ॥ श्री ॥ २० फेब्रुवारी १७५४. पंतप्रधान पु॥ श्रीमंत राजश्री स्वामीचे सेवेसी: कृतानेक विज्ञापना. मिरजाअबदलाबेग व यादगारबेग व ईनायदुलाबेग हे तिघे भाऊ शिकंदरे पातशहाचे घराणयाचे सीपाही चांगले व खुदातरसी फकीरी तौराने राहतात. रामदासपंताचे हंगामेयांत मोगलाचे लष्करांत सेवकास भेटले होते. कितेक भविण्याच्या गोष्टी सेवकाजवळोन हुजूर लेहविल्या होत्या. त्याप्रमाणे घडोनहि आले. सांप्रत छ ९ रविलाखरी मिरजा अबदलाबेग सेवकास भेटले. बोलत होते की आपला धाकटा भाऊ यादगारवेग रावसाहेबांचे बांदगीस गेला आहे. त्यास जाऊन दोन महिने जाले. आपण दोघे भाऊ ये जागा आहों. मोगल लोक आह्मास चाहत नाहीं व आमीहि त्यांची परवा धरीत नाही. तूर्त मोंगलांचे दौलतेची अखेरी आली. रावसाहेबांचे ताले बुलंद. दीनबदीन दौलतेची तरकी आहे. याजबदल पांच वख्त उजू नमाज करून ईलाहीनजीक रावसाहेबांचे हक्कामध्ये दुवायाद करीत आहों. प्रस्तुत आह्मास बशारत जाली आहे की लढाईमध्ये तमाम मोगल मारले गेले. सलाबतजंगास कबरेमध्ये गाडावयास नेले. शहानवाजखानास जखमा लागल्या. बहुत जेर जाले. तोंडांत पाणी घालितात. मुसाबुसीचे शीर कापिलें. लष्कर गारत जालें. रावसाहेबांचे झेंडे औरंगाबादेत दाखल जाले. अवरंगाबादचें अलम तमाम ७९ १७५४ पूर्वी शिकंदर नांवाचे पातशाहा दिल्लीचे तख्तावर दोन होऊन गेले:शिकंदरलोदी व शिकंदर सूर. पैकी शिकंदर लोदीने इ. स. १४८८ पासून १५१८ पर्यंत राज्य केले. हा पातशाहा मोठा तेजस्वी होता. तो हिंदूचा अतिशय छळ करीत असे. अर्थात् , मुसलमान लोकांत त्याला फार पूज्य मानीत असत. त्याच्या वंशांतील हे तिघे बंधू असावेत. ह्या शिकंदराचा पुत्र जो इब्राहिम त्याला बाबराने पानिपत येथे १५२६ त मारून टाकिलें. तेव्हां त्याच्या घराण्यांतील पुरुष व स्त्रिया दक्षिणेत पळून आल्या असाव्या.