पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/187

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उगेच मनसबे करीत होते. सेवक मुसाबुसीजवळहि बोलिलों. ते बोलिले की आह्मी सहसा हे गोष्ट होऊ देणार नाही. प्रस्तुत धारूरचे घाटें जावयाचा करार केला. ईटखेडेयावर सात मुकाम होते. छ १६ रबिलाखरी शनवारी ईटखेडेयाहून कूच केलें. सातारेयाचा डोंगर डावा टाकून पांच कोश जळगांवावर मुकामास आले. कुचाचे समई सैदलष्करखान शहरांतून दोन तीनशे स्वार व पांचसातशे गाडदी इतके जमावानसी आले. नवाबाजवळोन वराडांत जावयास रुखसत जाले. नवाब स्वार होऊन निघालेयावर सैदलष्करखान मुसाबुसर्साचे डेरेयास आले. मुसाबुसी येही खानास घोडा येक व वस्त्रं दिली. तदनंतरें खानांहीं ईटखेडेयाचे मुकामी डेरा उभा केला होता. त्या डेरेयास मुसाबुसी आले. तेथें चार घटिका होते. खानांहीं वस्त्रे दिली. मग खान शहरांत गेले. मुसाबुसी मुकामावर आले. आज रविवार छ १७ रोज लष्करचा मुकाम जाला. अद्याप शहरांतन बहुत लोक येणे आहेत. करनाटकांत जावयाचे दिवस राहिले नाही. हैदराबादस छावणीस जातील असे दिसते. अद्याप नवाबाची फौज जमा जाली नाही. फौजेचा दंगा चुकला नाही. ख्वाजे न्यामदुलाखान अद्याप काळे चौतरेयावरच आहेत. त्यांचा कुच जाला नाही. मुसाबुसी यांहीं खानास घोडा एक व शिरपेंच दिधला. तसाच खानांहीं मुसाबुसीस घोडा एक व शिरपेंच दिधला ह्मणोन अबदुलरहिमानग्वान बोलत होते. मसलहतीचा विचार अबदुलरहमानखान यांस पुशिला की कर्नाटकांत जावयाचे दिवस राहिले नाहीं; काय विचार केला ? बोलिले की तूर्त कृष्णातीर पावेतों जातों, पढें विचार करणे तो केला जाईल. सेवसी श्रृत जाले पाहिजे हे विज्ञापना. ERA DRA? सार्वजनिक काजल खेड, (f.).