पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/186

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रांतच आहेत. सैदलष्करखान याज बराबर निघत नाहीं, शहरांत राहतात. स्यास शहरांत सुबदारी सांगोन ठेवितात हाणून बोली आहे. दोन हजार स्वार तैनात करून ठेवणार याप्रमाणे करार होता. मागती मनसबा फिरला. सैदलष्करखानास वराडचा सुभा सांगितला. औरंगाबादेस अद्याप कोण्ही सुभेदार करार जाला नाही. सवेसी विदित होय. सुभानजी थोराताने छ १० रबिलाखरी नवाबाची मुलाजमत केली. बराबर पंचवीसेक घोडी होती. सेवेसी विदित व्हावयाकरितां विनंति लिहिली आहे हे विज्ञापना. [२४] पै॥ छ २७ र॥खर ॥ श्री ॥ २० फेब्रुवारी १७५४. पंतप्रधान पु॥ श्रीमंत राजश्री स्वामीचे सेवेसी: कृतानेक विज्ञापना. मोगलाचा कुच काळे चौतरेयाहून पुण्याचे रुख ईंटखेडयावर जाला होता. छ ९ ॥खरी ईटखेडयावर आले. येथे मनसबा घाटत होता की रावप्रधान सालगुदस्ताहि करनाटकांत गले. सालमरीहि तिकडेच मुतवजे जाले. तेव्हां आली मुलुकगिरी कशाची करावी ? याजकरितां पुण्याचे रुखें दबाव टाकीत जावे झणजे सहजेंच माघार फिरान येतील. पुण्याकडे काय ह्मणोन दबाव टाकिला ह्मणतील तर त्यांस जाब आहे की तुझी आझा शिवाय काय ह्मणोन कर्नाटकांत जाता ? सालगुदस्ता तुह्मी गेलेत. सालमारी आमी जाऊ. ऐस एस मनसबा करीत होते. फारकरून न्यामदुल्लाखान तहवरजंगाचा विचार होता. सामर्थ्य तो नाही. परंतु ७८ ह्या पुण्यावर चालून येण्याच्या हुलकावणीचा वृत्तांत ग्रांटडफ्च्या इतिहासांत दिला नाही.