पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/184

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रागास आले. हादीखानाने अजीजी बहुत केली की या मामलेयाकरिता कर्जबाजारी जालों. अतःपर मामला न सांगा, तेव्हां जीव द्यावा लागेल. याउपर शहानवाजखान यांहीं मुसाबुसीचे मनोगतानुरुप सदहूं अदबानीचा मामला ख्वाजे न्यामदुलाखानास करार केला. हादीखानास नांदेड माहोराकडे मामला सांगणार. ख्वाजे न्यामदुलाखानास आजउद्यां खलअत होईल. सेवेसी श्रृत जालें पाहिजे. सफसीलानखानास हैदराबादचा मामला सांगितला. कालिकादास पेशकार जाला. खानमनिले छ २ ॥वली मुहूर्ताने प्रस्थान करून आपले बागांत जाऊन राहिले. तीन लाख रुपये रोख व तीन लाख रुपयाचा कबजा येकूण सालाख रुपये द्यावयाचा करार जाला. त्याचा सरंजाम होत आहे. येकदो रोजा ऐवजाची निशा करून देऊन मग हैदराबादेस जातील. बीजदास हैदराबादचा पेशकार व त्याचा भाऊ गुलाबदास या दोघांस शाहानवाजखानांनी कैद करून मुसाबुसीचे स्वाधीन केले. ब्रीजदासावर तकरीर निघाली आहे. जाबसाल अद्यापवर काही नाही. पुढे काया निकाल पडेल त्याप्रमाणे सेवेसी विनंति लेहून पाठवितों. नवाब. सलाबतजंगाचे शरिरी सावकाश नाही. गोंवर निघतो ह्मणून आवई बोलतात . समाचार घेतां गोंवर नाही, ज्वरच आहे. छ ३ रोजी काही उपशम जाला ह्मणून लोक बोलतात. कोण्ही बोलतात की नवाबाने धास्ती घेतली सेवेसी श्रृत जाले पाहिजे. छ २७ सफरी मुसाबुसी सैदलष्करखानाचे परामर्शास गेले होते. प्रस्तुत खानम॥निले आजाराची सबब करून घरांत आहेत. शहानवाजखानाचा व खानाचा येक विचार आहे. परस्पर येकयेकाकडे जात येत असतात. सेवेसी विदित जाले पाहिजे हे विज्ञापना. FERAL PARADY GENER सारजानेकदा मनाला V1000