पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/183

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

येकादो रोजां रवानगी होईल. साल गु॥ भालकीचे मुकामावर मोगलाने सला केला त्या दिवसांत सैदलस्करखानांनी आपणाकडील भीलालखान दिल्लीस पाठविला होता. हाली त्यांस फरोजजंगाचे लेकानें कैद केलें ह्मणून वर्तमान आलें तें सेवेसी विदित व्हावयाकरितां विनंति लिहिली आहे. सैदलकरखान अद्याप वसवासांतच आहेत. मुबारजखान व महमदअनवरखान व हैदरयारखान वगैरे तमाम ख्वाजे अबदुलरहमानखानाकडे येत जात असतात. प्रस्तुत येथे प्राबल्य मुसाबुसी यांचे आहे. नवाब सलाबतजंगास कोणी पुसत नाही. तुर्त नवाबास बरे वाटत नाही. छ १९ रावल व छ २५ ॥वल दोन तेरिखा डेरे बाहेर करावयास करार केल्या आहेत. निघतील तेव्हां खरें. आढळलें वर्तमान सेवेसी विनंति लिहिली आहे. सेवेसी श्रृत जालें पाहिजे हे विज्ञापना. [२२] पै॥छ १०॥वल ॥ श्री ॥ ५ जानेवारी १७५४. पंतप्रधान पु॥श्रीमंत राजश्री स्वामीचे सेवेसी: कृतानेक विज्ञापना. अबदलहादीखानाजवळोन जबरदस्तीने मुसाबुसी यांहीं मुकाम करविला. तेव्हां अबदुलरहमानखानास नवाबाने बोलावून नेले. मजकूर मनास आणितां नवाब बोलिले की आह्मी त्यास रुखसत केलें नाहीं. जागा गळीच झाली ह्मणोन दुसरे जागा रहावयास जात होते ह्मणोन संपादणी केली. अबदुलहादीखानाने अडीच लाख रुपयांच्या कबजा छ २ रवली प्रहररात्रीं शहानवाजखानाजवळ रुजू केल्या. त्या कबजांमध्येहि दिक्कत निघाली व दीडलाख रुपयास जागा नाही. सबब शहानवाजखान