पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/182

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[२१] पै॥छ १०॥वल एकादशी ॥ श्री ॥ ५ जानेवारी १७५४. पंतप्रधान पु॥ श्रीमंत राजश्री स्वामीचे सेवेसी: कृतानेक विज्ञापना. छ ३ रबिलोवली तृतीय प्रहरानंतरे त्रिचनापल्लीहून चार जोडिया हरकारे आले. फरासि सांचा मोर्चा त्रिचनापल्लीस होता. फरासिसांही त्रिचनापल्ली फते केली. कोटांत लोक शिरले; ठाणे काईम केलें; ह्मणोन वर्तमान आले. त्याजवरून मुसाबुसी यांहीं बहुत खुशहाली केली. पन्नास पाऊणशे तोफांचे आवाज केले. सेवेसी विदित व्हावयाकरितां विनंति लिहिली आहे. प्रस्तुत मुसाबुसी काहीं नौनिगादास्त ठेवीत आहेत. हजारेक गाडी नवे ठवितात ह्मणोन वर्तमान आहे. ख्वाजे कलंदरखानास पेशजी नवाबाचे अमलांत मचलीबंदरचा मामला सांगितला होता. त्यांजकड़े नव दाहा लक्ष रुपयांची तकरीर निघाली. वाजपुस व्हावी तो खानम।।रनिले पळोन फुलचरीवालेयाचे आसरेयास गेले. पुढे नवाब वारला. नासरजंग ठिकाणी लागले. प्रस्तुत खानम॥रनिले मुसाबुसीसमागमें हैदराबादेस आले. दोनेक महिने जालियावर मृत्यु पावले. त्यांचे पुत्र अंबदुलरहिमानखान मुसाबुसी यांजवळ कुल यख्तीयारी. त्यांस सीहजारी मनसब व नोबत निशाण व कलंरदखान किताब दिधला. तें वर्तमान हुजूर विनंति पत्री लेहून पाठविले आहे. ख्वाजे अबदुलरहिमान यांहीं बापाचे मामलेयाची फारीखती सलाबतजंगाजवळोन घेतली. छ १ रबिलोवली नथमलांनी आणून दिली. सेवक समीप होतो. सेवेसी विदित जाले पाहिजे. राजश्री परशरामपंत अबदुलहादीखानाचे कामकाजांत बहुत बाजीद होते. शेवट त्यांचे चालिलें नाही. तो मामला न्यामदुलखानास जाला. विदित जाले पाहिजे. मुसाबुसी व न्यामदुलाखान 'सरकारांत लग्नकार्याचे आहेरांची वस्त्रे पाठवीत आहेत. .७७ अबदुलरहिमानखानाचा हा पूर्ववृत्तांत इंग्रजी इतिहासकारांनी दिला आहे.