Jump to content

पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/181

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ळलें वर्तमान सेवेसी विनंति लिहिली आहे. मुसाबुसी यांचे अंतर्याम तो सरकारतर्फेसी निःकपट आहे. परंतु प्रस्तुत नौनिगादास्त करीत आहेत. सुरतेकडून बंदुका वगैरे सामान येत आहे. मुसा मरलोहि फुलचरीस गेला, पुढे काय मनसबा करणार आहेत कळत नाही. राजश्री नागोराव राहुजी प्रस्तुत येथे मुसाबुसी व शहानवाजखान वगैरे यांजवळ जाबसालांत आहेत. म॥रनिलेचा सेवकाचा परिचय नव्हता. राजश्री शामजीपंत टकले यांहीं सेवकांस सांगितले की नागोरावजी सरकारतर्फेचे आहेत. सालगुदस्ता यांहीं सरकारकामांत कोसीस बहुत केली. हुजूरहि रुजू आहेत. तुह्मास हरयेक गोष्ट पुसणे तर यांस पुसावी. सांगतील ह्मणोन बोलिले. व नागोरावजी प्रस्तुत येथें बहुत पेश आहेत. स्वामीचे प्रतापाचा स्तव बहुत करीत असतात. म॥रनिले येही सेवेसी विनंतिपत्र लेहून दिल्हें तें सेवेसी पाठविलें आहे. त्याजवरून विदित होईल. नागोराव याचे पत्राचे उत्तर पाठवावयाची आज्ञा करावयास स्वामीधणी समर्थ आहेत. मार्गशीर्षमासांत ये जागा तीन वेळां पर्जन्यवृष्टी जाली. पौषमासींहि सप्तमी इंदुवारी पर्जन्यवृष्टी जाली. सेवेसी श्रुत जाले पाहिजे. राजश्री परशरामपंत वर्तमान लिहीत असतील. त्या गोष्टी प्रमाणांत आहेत. सेवकास आढळले मजकूर विनंति लिहिली आहे. राजश्री शामजी गोविंद येथून छ २ ॥वली स्वार होऊन हुजूर आले आहेत. येथील सविस्तर वर्तमान विदित करितील. सेवेसी श्रृत होय हे विज्ञापना. ७६३१ डिसेंबर १७५३.