पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/180

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

खानाची पेशकारी सांगितली. इतकेयानेच तूर्त त्याची समजावीस केली. लष्करास तूर्त दुमाहा तलब देणे. नवाबाचा खास खर्च दरमहा लाग्ख सवालाख. रुपयेयास जागा नाही. याजकरितां बाहर निघत नाही. पुढे काय मनसबा करितील तो पाहावा. नवाब सलाबतजंगाच्या चित्तांत बाहेर निघावयाचें नाहीं. मुसाबुसी नवाबास बाहेर काढणार. मीरमहंमदहुसेनखान यांचा पेशकार ब्रीजलाल व त्याचा भाऊ गुलाबराय उभयतांस छ १ रवली शहानवाजखानांहीं कैद करून मुसाबुसी यांजकडे पाठविले. पेशकार मजकुराने हैदराबादेस पैका बहुत मेळविला आहे. याजकरितां त्याजजवळ पैका मागत आहेत. सेवेसी विदित जाले पाहिजे. सुरतेकडून फरासिसाचा सामान पांच सात हजार बंदुका व चाळीस पन्नास तोफा व गरनाळा ऐसा सरंजाम येत आहे. सुरतेहून सामान निघाला ह्मणोन छ २ ॥वली मुसाबुसीकडे पत्रे आली. त्याजवरून खुशबाली केली. दाहावीस तोफा मारिल्या. सेवेसी विदित व्हावयाकरितां विनंति लिहिली आहे. हे विज्ञापना. । २० पै॥छ १०॥बल ॥ श्री॥ ५ जानेवारी १७५४. पंतप्रधान पु॥श्रीमंत राजश्री स्वामीचे सेवेसीः कृतानेक विज्ञापना. माधवसिंग जयनगरास आले. सरकारची फौज जयनगरासमीप आठदाहा कोशांचे अंतरायानें आहे. जाबसालास माधवसिंगाकडून वकील आले आहेत ह्मणोन सराफेयांत लिहिली आली. आढ ७५ ह्यावरून दादासाहेब १७५३ च्या डिसेंबरांत जयनगरासमीप आले होते असें होतें. दादा थालनेराहून १७५३ च्या सप्टंबरांत निघाले.