पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/179

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मुसाबुसी याजकडे आले आहेत. गोटाबाहेर राहिले आहेत. अद्याप भेट जाली नाही. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना. छ १० ॥वल. ॥ श्री॥ ५ जानेवारी १७५४. पंतप्रधान श्रीमंत राजश्री स्वामीचे सेवेसी: विनंति सेवक रघुनाथ गणेश चरणावरी मस्तक ठेऊन साष्टांग नमस्कार कृतानेक विज्ञापना. स्वामीचे कृपादृष्टीने सेवकाचे वर्तमान त॥ छ ४ माहे रबिलावल पावेतों मे॥ काळाचौतरा समीप शहर औरंगाबाद येथे यथास्थित असे. येथील वर्तमान तागायत छ २३ सफर हुजूर विनंतिपत्री लहून पाठविले आहे त्यावरून विदित जालें असेल. नवाब सलाबतजंगांहीं त्वरेनें बाहेर निघावें हा मुसाबुसी यांचा विचार. याजकरितां नवाबाने छ २७ सफरीं वेदमू राजश्री सखंभट जोशी व उमापती जोशी वगैरा जोशी ऐसे पुणतांबेकर चार पांच जोशी मेळऊन मुहूर्त पाहिला. जोशांनी छ १९ ॥वल व छ २५ र॥वल ऐसे दोन मुहूर्त सांगितले. हे मुहूर्त लांब. यास्तव शहानवाजखान वंगरे मोगलिये यांहीं छ ३० सफर करार केला. छ ३० सफरीं डरे बाहेर होतात ह्मणोन आवई गरम होती. निदान ते दिवशी बाहेर निघाले नाही. मख्य गोष्ट द्रव्य नाही. याजकरितां बाहेर निघणे होत नाही. फीलखाना व अस्तबालास व उंटास दाणा नाही. फाके गुजरतात. सफसीलानखानास हैदराबादचा मामला सांगितला. सालाख रुपये तूर्त घ्यावयास करार केला; पे॥ तीन लाखाच्या कबजा व तीन लाख रुपये राख. त्याचा सरंजाम अद्याप नाही. कालिकादास, नवाबाचा मोधी, त्याचे देणें पांच सालाख रुपये नवाबाकडे आहे. द्यावयास ऐवज नाही. यास्तव कालिकादासास सफमीलान