पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/178

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रितां रावसाहेबी या लोकांस नजरेंतच धरावें. रावसाहेबांचा व आमचा येखलास एक विचार असतां दुसरेयाची गुंजाईष आहे ऐसें नाही. हे गोष्ट तर काय ? कित्येक उमदे उमदे मनसुबे खातीरख्वाह होतील. तूर्त आह्मी शहरास जात आहों. यख्तीयार आमचाच आहे. आह्मी रावसाहेबांजवळ निखालस ये खलास राखितो. ह्मणूनच दिलांतील मजकूर खोलून बोलतो. व पेस्तरहि ज काम करणें तें रावसाहेबाचे इतिलासिवाय करणार नाही. आह्मी रावसाहेबांजवळ ये खलास केला तो थोडके रोज चालावयाचा केला नाही. पुस्तदरपुस्त चालावा ह्मणोन केला. आमी गेलों, आमचा भाऊ दुसरा आला, तर हाच करार आहे. इतकें बोलोन सेवकास बोलिलें कीं रावसाहेबांचे तर्फेनें आह्माजवळ वकिली तुमची आहे. तुह्माशिवाय दुसरा वकील आह्मी चाहत नाही. परशरामपंत वकील रावसाहेबांचे नवाब सलाबतजंगाजवळ आहेत त्यांम आह्मी बहुत चाहते होतो. आतां त्याजवळोन तफावत दिसोन आला. याजबद्दल आमचे दिल त्यास चाहत नाही. तफावत कोण तो झणाल तर आझी हैदराबादेस आलों, तसेंच औरंगाबादेस येत होतो. आमास लेहून पाठविलें की तूर्त न यावें, तेथेच राहावे. येथें आलियाने रुकुनदौला यास वसवास येईल ह्मणोन कैवजा लिहिले. आह्मी सचोटीचा माणूस जाणून राहिलो. पेस्तर रुकुनदौला याचे मारिफत सुलह करून मग आमास लिहिले की आतां तर काम जालें; तुह्मी आले असतेत तर खूब होते. याजवरून दगाबाजी कळली व आणीकहि कित्येक गोष्टी आहेत. याजबद्दल त्यास आमचे दिल चाहत नाही. याप्रमाणे तुही रावसाहेबांस लेहून पाठविणे ह्मणोन बोलिले. त्यावरून सेवेसी विनंति लिहिली आहे. सदई विनंतिपत्र अक्षरशा सॉर्थ मुसाबुसी यांहीं आईकिलें. सेवेसी श्रुत जाले पाहिजे. छ १९ रोजी शहरांतून नथमल दी॥ सैदलस्क खान व गुलाममहमदखान ऐसे उभयता ७४ फ्रेंच किंवा उर्दू भाषेत तर्जुमा केलेलें. बुसीचा दुभाषा अबदुलराहिमानखान नावाचा होता. त्याला फ्रेंच भाषा येत असे.