पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/175

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आला. तें वर्तमान पूर्वी सेवेसी विनंतिपत्रीं लिहिले आहे. त्याजबराबराल फरंगी मागाहून येत होते. ते फरंगी शंभर, त्याजमध्ये चार सरदार, ऐसे छ १७ रोजी आले. मुसाबुसी मागे येतां मौजे पिंपळनेर बीबीचे येथील गांवकरी यांनी मुसाबुसी यांचा बैल संदुकांचा नेला. मागाहून गारदी येत होते त्यांस कळतांच गांवचे पाटलास सदहूं बैल सुद्धां घेऊन आले. पाटलाजवळोन दीडशे रुपये गुन्हेगारी घेऊन सोडिला. सेवेसी श्रुत होय. ख्वाजे न्यामदुलाखान यांजकडे हस्तनापुरचें वर्तमान लिहिले आले. बोलत होते की जयसिंग याचा लेक पातशाहास भेटला त्याचे मारीफतीने जाँटेहि पातशहास मिळाले. फेरोजजंग याचा लेक वजिराजवळ युद्धप्रसंग करीत आहे. अद्याप लढाई काईम आहे. कितेक हत्ती व उंट वजिराचे फेरोजजंगाचे लेकानें आणिले. वजीर सफैजंग लढाई लढत नाहीं याजकरितां फैसला होत नाही. प्रस्तुत पातशहाचा जोरा आहे ह्मणोन बोलत होते. मेवेसी विदित व्हावयाकरितां विनंति लिहिली आहे. मुसाबुसी कितेक गोष्टी बोलिले ते मजकूर अलाहिदा विनंतिपत्राचे पुरवणींत लिहिले आहेत. त्याजवरून त्यांहीं सक्सी पत्र दिल्हें. ते थैली सेवेसी पाठविली आहे त्याजवरून विदित होईल. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना. - ७३ सुरजमल जाट हा सफदरजंगाला मिळाला होता. वजीर सफदरजंगाचें व फेरोजजंगाचा लेक जो मीरशाबुद्दिन अथवा धाकटा गाजुद्दिन याचे वाकडे होते. पातशाहा गाजुदिनाच्या तंत्राने चालत असे. गाजुद्दिनाच्या घरबुडव्या पोरकटपणाला त्रासून सफदरजंग लखनौला निघून गेला. तेव्हां सुरजमलजाट मात्र गाजुद्दिनाच्या तडाक्यांत सांपडला. गाजुद्दिनाचे साहाय्यकारी होळकर व शिंदे होते. त्यांच्या साहाय्याने पुढे गाजुद्दिनाने पातशाहालाहि पदच्युत केलें व दुसरा अलमगीर नांवाचा पातशाहा तख्तावर बसविला. ६ माधोसिंग.